1. बातम्या

काय सांगता ! ७६९ रुपयांचा एलपीजी गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयात; जाणून घ्या ऑफर

सध्या आपल्याला महागाईचा मार सहन करावा लागत आहे. इंधनाच्या दर वाढीनंतर भाजीपाल्यांचे दरही वाढत आहेत. यामुळे लोकांच्या खिश्याला झळ पोचत आहे. आता गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. किंमत जास्त असूनही आपल्याला सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. परंतु, जर तुम्हाला स्वस्तात सिलिंडर खरेदी करायचा असेल तर एक जबरदस्त ऑफर आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
एलपीजी गॅस सिलिंडरसाठी Paytm ची ऑफऱ

एलपीजी गॅस सिलिंडरसाठी Paytm ची ऑफऱ

सध्या आपल्याला महागाईचा मार सहन करावा लागत आहे. इंधनाच्या दर वाढीनंतर भाजीपाल्यांचे दरही वाढत आहेत. यामुळे लोकांच्या खिश्याला झळ पोचत आहे. आता गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. किंमत जास्त असूनही आपल्याला सिलिंडर खरेदी करावा लागत आहे.

परंतु, जर तुम्हाला स्वस्तात सिलिंडर खरेदी करायचा असेल तर एक जबरदस्त ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या सिलिंडरची किंमत ७६९ रुपये आहे. ही ऑफर लिमिटेड वेळेसाठी आहे. जाणून घ्या सविस्तर ऑफर.

एलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतर मिळणार ७०० रुपयांचा कॅशबॅक

ही ऑफर Paytm वर मिळत आहे. युजर्संना यासाठी एलजीपी सिलिंडर पेटीएमवरून बुक करावे लागेल.

सर्वात आधी Paytm वर जा. फोनमध्ये अॅप नसेल तर अॅप डाउनलोड करा.

यानंतर मेन पेजवर दिलेल्या Recharge & Pay Bills पर्यायाला टॅप करा. यानंतर Book a Cylinder वर टॅप करा.

आता जे पेज तुमच्या समोर असेल यात गॅस सर्विस प्रोव्हाइडरला सिलेक्ट करा. त्यानंतर आपला १७ डिजिटचा एलपीजी आयडी टाका.

 

पुन्हा गॅस सिलिंडरला सिलेक्ट करा. आता एलपीजी आयडीच्या जागी कंज्यूमर नंबर किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकू शकता. यानंतर प्रोसिडवर टॅप करा.

या ठिकाणी तुमची डिटेल्स दिसेल. खाली ७६९ रुपयांची रक्कम दिसेल. तसेच खाली स्क्रॉल केल्यानंतर एक ऑफर दिसेल. ज्यात युजर्संना ७०० रुपयांचा कॅशबॅक दिली जाणार आहे. एक स्क्रॅचकार्डसाठी.

या पेजवर देण्यात आलेले Proceed to Book Cylinder वर टॅप करावे लागेल.

यानंतर तुम्हाला काही ऑफर्स दिले जातील. या ठिकाणी खाली Apply Promocode लिहिलेले असेल.

यावर टॅप करा. खाली दिलेल्या LPG ऑफर जवळ देण्यात आलेल्या Apply वर टॅप करा. ही ऑफर अप्लाय होईल.

यानंतर तुम्हाला पेमेंट पेजवर घेऊन जाईल. या ठिकाणी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता.

 

सध्या तुम्हाला ७६९ रुपयांचे पेमेंट करावे लागेल. परंतु, कॅशबॅकमध्ये तुम्हाला काही रक्कम परत मिळून जाईल. जर युजर्संना ७०० रुपयांचा कॅशबॅक परत मिळत असेल तर त्यांना गॅस सिलिंडर फक्त ६९ रुपयांत मिळेल.

नोटः ७०० रुपयांचा कॅशबॅक पेमेंट एका युजरला केवळ एकदाच मिळेल. तसेच ही ऑफर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत उपलब्ध आहे. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस कंपनीसोबत करार केला आहे.

English Summary: LPG cylinder of Rs 769 for only Rs 69, know the offer Published on: 25 February 2021, 10:32 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters