MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद

कोरोनामुळे अनेक देशातील उद्योगधंद्यावर परिणाम झाला. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान आता हळूहळू सर्व परिस्थिती रुळावर येत आहे. पण कोरोनाचा परिमाण पाहता भारत सरकारकडून उद्योगांना चालना देण्यासाठी कर्जांची सुविधा दिली आहे.

KJ Staff
KJ Staff


कोरोनामुळे अनेक देशातील उद्योगधंद्यावर परिणाम झाला. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान आता हळूहळू सर्व परिस्थिती रुळावर येत आहे. पण कोरोनाचा परिमाण पाहता भारत सरकारकडून उद्योगांना चालना देण्यासाठी कर्जांची सुविधा दिली आहे. पण शेती व्यवसायात मात्र याचा काही उपयोग होताना दिसत नाही. कोरोनाचा परिणाम पीक कर्ज वाटपावर झालेला दिसत असून बँका आपले ध्येय्य पुर्ण करण्यास असक्षन दिसत आहेत.

यंदा पीक कर्ज घेण्याला रत्नागिरी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे. करोनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे अगदी साहजिकच आहे कोरोनामूळे सर्व क्षत्रात कमालीची घसरण अनुभवास येत आहे. चालू आर्थिक वर्षांत जिल्ह्यासाठी ५६३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात आत्तापर्यंत ३२० कोटी १६ लाख रुपयेच कर्ज वितरीत झाले असून उद्दिष्टाच्या तुलनेत ५६ टक्केच लक्ष्य गाठण्यात बॅंकांना यश आले आहे. कोकणातील शेतकऱ्याचा मुळातच कर्ज काढून शेती  करण्याकडे अत्यंत कमी कल आहे. खरीप हंगामातील भातशेतीसाठी फारसे कर्ज उचलले जात नाही.तसेच काजू पीकाला कोकणात मोठा भर देण्यात येतो.


निसर्ग चक्री वादळामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनार्यावरील जिल्ह्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आंबा—काजू बागायतींसाठी घेण्यात येणारी कर्जे वगळता व्यावसायिक तत्त्वावर रब्बीची शेती करणारे कमीच आहेत. जिल्ह्यात शेती करणाऱ्या सभासदांची संख्या सव्वालाख असून ८५ हजार हेक्टरवर शेती होते. त्यात भात लागवडीच क्षेत्र सुमारे ७० हजार हेक्टर आहे. गावागावात मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईहून दाखल झाल्यामुळे यंदा फळबाग लागवडीसह भातशेतीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती; परंतु कोरोनातील टाळेबंदीमुळे शेतकरी कर्जप्रकरण करण्यासाठी बाहेर पडणेच शक्य होत नव्हते.


त्याचबरोबर घेतलेले कर्ज फेडताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली असावी, असा अंदाज आहे. अजून बऱ्याच ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू नाही आणि हवामानातील बदल तसेच त्यामुळे होणारे नुकसान यामुळे लोकांनी पीक कर्जाकडे पाठ फिरवली आहे, असे वर्तवण्यात येते. जिल्हा निबंधक डॉ. अशोक गार्डी म्हणाले की, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक कर्ज बँकांनी उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना दिली होती. पण यंदा करोनामुळे कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले आहे.

English Summary: Low response of farmers for crop loan in Ratnagiri district Published on: 06 November 2020, 03:25 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters