हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
हिंदी महासागराच्या पूर्व भागात तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात हा दाब वाढणार असून त्यानंतरच्या 12 तासात या भागात वादळ येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: हिंदी महासागराच्या पूर्व भागात तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात हा दाब वाढणार असून त्यानंतरच्या 12 तासात या भागात वादळ येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात हा पट्टा श्रीलंकेच्या किनाऱ्यावरुन तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल, यामुळे येत्या 30 एप्रिल आणि 1 मे ला आंध्रप्रदेश तसेच तामिळनाडूच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या काळात समुद्रही खवळलेला राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 26 ते 30 एप्रिल या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.
English Summary: Low pressure area develops in Bay of Bengal and Indian OceanPublished on: 29 April 2019, 07:57 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments