Hingoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस या पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. हिंगोली तालुक्यातील शेत शिवारामधील अन्य पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे.
शेत शिवारात शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून ठेवले आहे. काही सोयाबीन पीक कापण्याचे बाकी आहे. अशा अवस्थेत जोरदार स्वरूपाच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी कापणीचे काम देखील थांबवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता पुढील कापणी जमीन सुकण्याची वाट पाहावी लागणार आहे. मात्र झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. जरी यातून काही पीक वाचले तर त्यांची शेतकरी कापणी करु शकतात.
शेतकऱ्यांनी कापणी करुन ठेवलेले सोयाबीन पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे. सोयाबीन सोबतच संपूर्णपणे कापसाचे पीक देखील पावसात भिजत आहे. यामुळे कापूस पिकाचे देखील नुकसान झाले आहे. यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून काहीतरी मदत याची अपेक्षा लागली आहे. तसंच नुकसानग्रस्तांना सरकारने मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
Share your comments