शेतकरी बचाओ आंदोलन चे वतीने विदर्भातील प्रकल्प ग्रस्त शेतकय्रांचे 1महिन्या पासून अमरावती येथे उपो षण आंदोलन सुरु;त्यांना पाठींबा देण्यासाठी शेतकरी बचाओ आंदोलनचे संयोजक भाई रजनीकांत व कार्यकर्ते 30दिवसापासून त्यांना पाठींबा देण्यासाठी सहभागी झालेत.गेल्या 1महिन्यात महाराष्ट्र सरकारने कोण त्याही प्रकारची तातडीची सकारात्मक भूमिका घेतली नाही.दि.1 एप्रिल रोजी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचे मा. पियुष सिंग;अमरावती विभागीय महसूल आयुक्त यांना सोबतचे निवेदनातील मागण्यांचे पत्र भाई रजनी कांत; विकास राणे;यांनी सादर केले व चर्चा केली.
त्यांनी सर्व मागण्यांचे अनुषंगाने आम्ही शासनाकडे आकडेवारीसह अहवाल पाठविला.व सरकारने 15- 20 दिवसात या प्रकरणी त्वरीत यथोचित कार्यवाही बद्ल विधानसभा अधि वेशनात मा. जयंत पाटील जलसंपदामंत्री यांनी जाहिर केले आहे.वरील मुदतीत शासनाने कार्यवाही न केल्यास व विदर्भातील आमदार;मंत्र्यांनी लक्ष्य घालून;शेतकय्रांना न्याय मिळवून न दिल्यास ;त्यांचे घरी धरणे;मोर्चे काढण्याचे; गांव रस्ता रोको व सळो की पळो असे आक्रोश आंदोलन करु;असे आयुक्तांना सांगित ले.लगेच वरील मागण्यांचे निवेदन मा. श्री. बच्चूभाउ कडू;जलसंपदा राज्यमंत्री यांना दिले.
लगेच वरील मागण्यांचे निवेदन मा. श्री. बच्चूभाउ कडू;जलसंपदा राज्यमंत्री यांना दिले;त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी संबंधित अधिकाय्रांना 15 दिवसात घेउन जाण्याचे व प्रत्यक्ष पाहणी व कार्यवाही करण्या चे भाई रजनीकांत यांना सांगितले.प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या बद्दल आवाज उठवण्याचे शेतकरी बचाओ आंदोलन चे वतीने यापूर्वीच विदर्भातील 15 आमदार; मंत्र्यांना सुचीत केले आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळ वुन देण्यास वरील निवेदन विदर्भातील सर्व आमदारांना लगेच पाठविण्याचे ठरले.
श्री.जयंत पाटील; जलसंपदा मंत्री;व महाआघाडी सरकारचे मार्गदर्शक मा. शरदचंद्र जी पवार दि. 10 एप्रिल ला अमरावती स येत आहेत. त्यांचे निदर्शनात विदर्भातील प्रकल्पग्रस्तां वरील झालेला अन्याय व त्याचे तातडीने परिमार्जन केल्या जावी;असे आवाहन करण्याचे ठरविण्यात आले. श्रीधर भिसे;काॅ.अशोकराव सोनारकर;राजेश गावंडे; अभिषेक गावंडे;मंगेश गावंडे आदि निवेदन देतांना उपस्थित होते.
विकास राणे;संघटक व प्रकल्पग्रस्त.
Share your comments