1. बातम्या

लॉकडाऊनचा परिणाम : भविष्यात कांद्याचे भाव घसरणार - अजित पवार

KJ Staff
KJ Staff


गेल्या ४५ दिवसांपासून देशात  लॉकडाऊन सुरू असल्याने शेती व्यवसायाला फटका बसत आहे.  शेतातील शेतमाल विकण्यास सरकार जरी परवानगी दिली पण ग्राहक नसल्याने मालाला योग्य भाव मिळत नाही.  लॉकडाऊनचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.  पुढील काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

आगामी काळात कांद्याचे भाव गडगडणार असल्याची शक्यता उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्यक्त केली. कोरोना व्हायरसमुळे देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यानंतरही राज्य आणि केंद्र सरकारची पुढील दिशा काय हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान शेतकऱ्यांना सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली पण तरी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अजित पवार यांनी सध्याची कांद्याची आवक आणि भविष्यातील उपलब्धता सांगताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांप्रती काळजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरुन कांद्याबाबत माहिती देताना भविष्यात कांद्याचे भाव घसरणार असल्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजारात आजमितीला कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे त्याला उठाव नाही. अनुकूल वातावरणामुळे रब्बी हंगामातही कांद्याचे उत्पादन वाढणार आहे. तो कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे भाव गडगडण्याची आणि त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने गेल्यावर्षी प्राईस स्टॅबिलायझेशन फंड योजनेंतर्गत नाफेडमार्फ महाराष्ट्रातील ४५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. त्या बफर स्टॉकमुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन देणं सरकारला शक्य झाले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters