1. बातम्या

'या' आर्थिक वर्षात केसीसी अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणार 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज; जाणून घ्या केसीसीचे फायदे

केसीसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड ही माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत देशातील गरजू शेतकऱ्यांना केंद्र सरकार आर्थिक मदत देत असते, या कार्डद्वारे देशातील गरजू शेतकऱ्यांना अल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड संबंधित बोलताना देशाचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नुकतीच एक महत्त्वाची माहिती देशातील शेतकऱ्यांना सांगितली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मते, कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत देखील भारतीय शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहे. त्यांच्या मते या चालू आर्थिक वर्षात देशातील शेतकऱ्यांना सोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष आहे. ते बोलताना पुढे म्हणाले की, किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील गरजू शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. आज आपण केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी किसान क्रेडिट कार्डचे फायदे याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
किसान क्रेडिट कार्ड

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीक्षेत्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आपल्या देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था संपूर्ण शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. या महत्त्वपूर्ण अशा शेती क्षेत्राचाशेतकरी अर्थात बळीराजा कणा आहे, त्यामुळे बळीराजाच्या विकासासाठी प्रत्येक सरकार वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण व शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजना राबवित असतात. या योजनांचा उद्देश केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचे हित जोपासून त्यांचे जीवनमान उंचावणे एवढाच असतो. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या अनुषंगानेच 2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार यांनी देखील अनेक शेतकरीहितार्थ योजना देशात अमलात आणल्या या योजने पैकीच एक आहे किसान क्रेडिट कार्ड योजना. या योजनेचा उद्देश देशातील गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे देशातील तमाम गरजू शेतकऱ्यांना बी-बियाणे, कीटकनाशके,खते इत्यादी शेतीच्या महत्त्वपूर्ण कामांसाठी कर्ज दिले जाते. या योजनेमुळे देशातील अनेक गरजू शेतकऱ्यांना फायदा मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

कोणते शेतकरी आहेत या योजनेसाठी पात्र?

किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी देशातील तमाम शेतकरी अर्ज करू शकतात. ज्या शेतकऱ्यांची स्वतःच्या मालकीची जमीन आहे असे शेतकरी तसेच ज्या शेतकऱ्यांची स्वतःच्या मालकीची जमीन नाही मात्र ते भाडेतत्त्वावर अथवा इतर पद्धतीने शेती करतात त्यांचा देखील या योजनेत समावेश होतो. तसेच मोदी सरकारने वर्ष 2018-2019 मध्ये या योजनेत एक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणली, आता या सुधारणे अनुसार देशातील मत्स्य पालन करणारे शेतकरी तसेच पशुपालन करणारे शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात व कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड द्वारे अर्ज करू शकतात.

किसान क्रेडिट कार्ड चे फायदे

•किसान क्रेडिट कार्ड ही देशातील गरजू शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करता यावी यासाठी सुरु केली केलेली केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअन्वये गरजू शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र असे असले तरी, या किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्याला किती कर्ज मिळणार हे सर्वस्वी त्याच्याकडे असलेल्या शेतजमिनीवर तसेच शेतकऱ्याकडे असलेली शेतजमीन बागायती आहे की जिरायती आहे यावरून ठरवले जाते.

•केसीसी च्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना 1,60,000 रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण दिले जाते, ही या योजनेची सर्वात मोठी विशेषता असल्याचे सांगितले जाते. मात्र 1,60,000 रुपयांपेक्षा जास्त कर्ज हवे असल्यास शेतकर्‍यांना तारण ठेवणे अपरिहार्य ठरते. या योजनेद्वारे जास्तीत जास्त तीन लाख रुपये कर्ज दिले जाऊ शकते.

•किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जापोटी केवळ सात टक्के व्याजदर आकारला जातो. तसेच जर शेतकरी बांधवांनी एका वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केली तर तीन टक्के व्याज दरात सवलत सरकारतर्फे देण्यात येते. म्हणजे या योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांनी कर्ज प्राप्त केले असेल आणि त्याची परतफेड एका वर्षाच्या आत केली असेल तर शेतकऱ्यांना अवघे चार टक्के व्याजदर भरावे लागणार आहे.

•किसान क्रेडिट कार्ड या मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी योजनेचे अजून एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत एक लाख रुपय पर्यंतच्या कर्जावर कुठल्याही प्रकारचा व्याज घेतले जात नाही, म्हणजे एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज मध्ये सवलत सरकारद्वारे दिल्ली केली आहे.

•तसेच, या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना अपघाती विमा देखील देण्यात येतो. म्हणजे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर पन्नास हजार रुपये संबंधित शेतकऱ्याला मिळतात तसेच जर अपघातात गंभीर दुखापत झाली तर पंचवीस हजार रुपये दिले जातात.

English Summary: Loans of Rs 16 lakh crore will be provided to farmers under KCC in this financial year; Learn the benefits of KCC Published on: 03 February 2022, 11:49 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters