1. बातम्या

मार्च अखेरपर्यंत पॅनला आधार कार्डशी जोडा; अन्यथा पॅन ठरेल अवैध

KJ Maharashtra
KJ Maharashtra
pan aadhar card link

pan aadhar card link

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने परमनंट अकाऊंट नंबर आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च निश्चित केली आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्डची लिंक केले नसेल तर ते येत्या 31 मार्च पर्यंत करणे अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्हाला आयकर कायद्यानुसार दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

पॅन आणि आधारकार्ड एकमेकाशी लिंक आहे की नाही कसे जाणून घ्याल?

 सर्वप्रथम आयकर विभागाच्या www.incometaxindiafiling.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिथे क्विक लिंक या पर्यायावर क्लिक करुन आधारवर क्लिक करा. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.  यापेजवर हायपर लिंक असेल, तिथे आधीपासूनच आधार लिंक करण्याच्या अर्जाची माहिती असेल.

या लिंक वर क्लिक करून आपल्याला आपले पॅन आणि आधार कार्ड चे तपशील द्यावे लागतील. हे झाल्यानंतर घेऊ लिंक आधार स्टेटस वर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला आपल्या आधार आणि पॅन लिंक झाले आहे की नाही याची माहिती मिळेल.

  

एसएमएस द्वारे कसे कराल आधार आणि पॅन कार्ड लिंक?

  • मेसेज बॉक्स मध्ये कॅपिटल लेटर मध्ये UIDPN टाईप करा. त्यानंतर स्पेस देऊन आपला आधार नंबर आणि पॅन नंबर टाका.
  • हा एस एम एस 567678 किंवा 56161 या नंबर वर पाठवा.
  • थोड्याच वेळात तुमचा आधार नंबर पॅन शी लिंक झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल.

.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters