विदर्भ, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज

24 June 2020 01:16 PM By: भरत भास्कर जाधव


मॉन्सूनची उत्तरेकडे वाटचाल सुरू झाली असली तरी महाराष्ट्रात मात्र पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज कोकण विदर्भातील काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळख ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर भारतात पूर्व पश्चिम विस्तारलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा थोडा दक्षिणेकडे सरकला आहे.

राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होता. तर ओडिशा आणि परिसराव र असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती नैर्ऋत्येकडे झुकलेली असल्याने उत्तर आणि मध्य भारतात पावसाला पोषक हवामान झाले. दरम्यान देशातील इतर राज्यातही पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या मते राजधानी दिल्लीत २७ जून रोजी पोहचणार मॉन्सून आता २५ जूनला धडकणार आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाने दिल्लीमध्ये मॉन्सूनच्या पावसासाठी ऑरेंज अलर्ट पण जारी केला आहे. जम्मू- काश्मीर, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि गुजरातला सोडून देशातील इतर भागात व्यापक स्वरुपात पाऊस होण्याची आशा आहे. हवामान विभागने मंगळवारी सांगितले की, दक्षिण- पश्चिम मॉन्सून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात प्रवेश करत आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंडीगड, पंजाब आणि राजस्थानच्या उर्वरित भागात पुढील ४८ तासात मॉन्सून पोहोचेल, यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

मागील २४ तासात  किनारपट्टीय कर्नाटकात, गोवा, छत्तीसगडातील काही भागात दक्षिण- पुर्वी मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम आणइ अंदमान निकोबार द्विपसमूहावर मॉन्सून सक्रिय होता आणि तेथे जोरदार पाऊस झाला. केरळ आणि कोकण, गोव्यात मॉन्सून सामान्य प्रदर्शन करत आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील काही भागात, किनारपट्टीय आंध्रप्रदेश, पूर्वेकडील भारत ओडिसाच्या काही भागात बिहार, मध्यप्रदेशातील काही भागात हलक्या आणइ मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. येत्या २४ तासात पूर्वेकडील भारत, उत्तर - पूर्वी बिहार, छत्तीसगडच्या काही भागात पूर्वी मध्य प्रदेश, दक्षिण - पूर्वी राजस्थानमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दक्षिण कोकणातील काही भागातही मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

rain forecast vidarbha Marathwada weather department IMD forecast weather forecast rain fall monsoon rainfall मॉन्सून पाऊस मॉन्सून हवामान विभाग हवामान विभागाचा अंदाज भारतीय हवामान विभाग
English Summary: Light rain forecast in Vidarbha, Marathwada

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.