धानाच्या पिकासाठी जी पारंपरिक पद्धत अवलंबिण्यात येत होती ती पारंपरिक पद्धत बाजूला काढून जवळपास दीड एकर क्षेत्रात हळदीच्या पिकाप्रमाणे वाफे तयार केले आणि त्यामध्ये धानाचे बीज रोवले गेले. जो लागणार खर्च होता त्या खर्चाची बचत करून सुमारे दोन ते तीन पट धान्याचे उत्पादन घेऊन भद्रावती येथील शेतकरी दत्तात्रय गुंडावर यांनी महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त केलेला आहे.
महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त दत्तात्रय गुंडावर यांनी त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग अवलंबिले आहेत. सध्याच्या युगात पाहायला गेले.तर दिवसेंदिवस शेतीसाठी लागणारे रासायनिक खताचा खर्च, मशागतीचा खर्च वाढतच निघालेला आहे तसेच शेतामध्ये मजुरांची कमतरता सुद्धा भासत चालली आहे त्यासाठी दत्तात्रय गुंडावर यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रात धानाच्या पिकाचा प्रयोग करण्याचे ठरविले.दत्तात्रय गुंडावर यांनी आपल्या शेतात गाठे तयार केले आणि ज्या प्रकारे हळद पिकाला वाफे तयार केले जातात त्या पद्धतीने त्यांनी वाफे तयार केले. २५ सेमी अंतरावर त्यांनी धान्याचे चार बीज रोवले आणि पुढे त्याच बीजाचे मोठी रोपे तयार होऊन त्यापासून धानाचे दाणे तयार झाले त्यासाठी त्यांना जवळपास पाच किलो धानाचा वापर करावा लागला होता.
दत्तात्रय गुंडावर यांनी कोणत्याही प्रकारची रोवणी केली नाही तसेच चिखल सुद्धा केला नाही आणि मजूर पण लावले नाहीत. त्यांनी जी पारंपरिक पद्धत होती ती आजिबात अवलंबली नाही आणि त्याचमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची बचत केली.वाफ्यांमध्ये जी चार बीजे रोवली गेली होती त्या चार बिजाला ५० ते १०० पीक तयार झाले तसेच एक एकर मध्ये जवळपास ४०० ते ५०० धानाचे दाणे तयार झाले. जे की यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा फवारणी केलेली नाही त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन मिळाले.
धानाची कापणी केल्यानंतर जे तयार झालेले धान असते त्या धानाचा वापर आपण सुमारे पाच वर्षे करू शकतो तसेच जी मुळे राहिलेली असतात त्या मुळांना तणनाशक मारून ते अवशेष मरून जातात आणि त्याचे कार्बन तयार होऊन त्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होते.आणि तेच शेतीला उपयुक्त ठरते. धानाच्या शेतीसाठी लागणार जो अवाढव्य खर्च होता तसेच मजुरांना लागणार खर्च त्याची बचत झाली. धानाच्या शेती वाफे पद्धतीने केल्यामुळे त्यामधून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढले गेले.
Share your comments