1. बातम्या

अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय मिळणार एलपीजी सिलिंडर संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

KJ Maharashtra
KJ Maharashtra
LPG cylinder

LPG cylinder

एलपीजी(LPG) सिलिंडर खरेदी करण्यासाठी अ‍ॅड्रेस प्रूफ खूप महत्वाचा आहे, पण आता अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय गॅस सिलिंडर खरेदी करता येईल. देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (आयओसीएल) ने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय आता ग्राहक 5 किलो लहान गॅस सिलिंडर (एलपीजी सिलिंडर) खरेदी करू शकतात. शहरांमध्ये शिकणार्‍या बहुतेक विद्यार्थ्यांना हा निर्णय मिळत आहे.

या स्टेप्स अनुसरणे महत्वाचे आहे:

LPG सिलिंडर खरेदी करताना आपण सर्वाना माहिती आहे किती त्रास सहन करावे लागतात आणि या CORONA काळात तर त्यात भरच पडली आहे कोणत्याही गोष्टी वेळेवर मिळतील याची काही खात्री नाही पण आपल्यास आता थोडा दिलासा मिळू शकतो अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय गॅस सिलिंडर खरेदी करत असाल तर या स्टेप्स अनुसरणे महत्वाचे आहे . पंतप्रधान उज्ज्वला गॅस कनेक्शनवरून फॉर्म डाउनलोड करा.तुमचा केवायसी फॉर्म नजीकच्या एलपीजी केंद्रात जमा करा.जनधन बँक, घरातील सर्व सदस्यांचा खाते क्रमांक यासारखी आवश्यक माहिती अपडेट करा 14.2 किलो सिलिंडर खरेदी करण्यासाठी तुम्हाला ही सर्व माहिती द्यावी लागेल.अशा प्रकारे सिलिंडर बुक केले जाऊ शकतात.

हेही वाचा:LPG गॅस सिलिंडर आता फक्त 9 रुपयांत मिळणार

गॅस सिलिंडर बुक करण्याचे इतर मार्ग अगदी सोपे आहेत.आपण घरी बसून एलपीजी गॅस सिलिंडर बुक करू शकता.

  • इंडेनचा एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्ही देशातून कोठूनही 8454955555 या क्रमांकावर मिस कॉल करू शकता.
  • व्हॉट्स अँपवरुनही बुकिंग करता येते. बुक करण्यासाठी मेसेंजरवर 'रिफिल' टाइप करा आणि 7588888824 नंबरवर पाठवा.
  • फोन नंबर 95 55555555 वर एसएमएस करून आपण गॅस सिलिंडर देखील बुक करू शकता.

काही दिवसापूर्वी आम्ही ऐकले होते कोविडच्या काळात जे गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉय असतात त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती आणि यामुळे गॅस सिलिंडर मिळण्यास व्यत्यय येत होता. पण आता वरील निर्णयामुळे थोडा दिलासा मिळेल हे नक्की.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters