तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी नक्की मिळतेय ना? लगेचच चेक करा

17 March 2021 08:19 PM By: KJ Maharashtra
सिलिंडरवर मिळवा सबसिडी

सिलिंडरवर मिळवा सबसिडी

 घरघुती  गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळतेय की नाही. याबाबत तुमचा गोंधळ होत असेल तर, तुमचा गोंधळ एका मिनिटात दूर होऊ शकतो. तुम्हाला सबसिडी  मिळतेय की, नाही, याबाबत एका मिनिटात माहिती मिळवता येऊ शकते

Check through LPG ID च्या माध्यमातून तपासा

पेट्रोलियम कंपन्या काही दिवसांपासून LPGच्या दरांमध्ये वाढ करीत आहेत. यामुळे असंख्य ग्राहक याबाबतीत विचार करीत  आहेत की, त्यांना सबसिडी मिळेल की नाही. तुम्हाला या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर, सबसिडी तपासण्याची पद्धत माहित करून घ्या. दोन पद्धतीने तुम्हाला सबसिडी तपासता येईल.

इंडेन, भारत किंवा एचपी या कंपन्यांकडे दिलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या आधारे गॅस पासबुक वरील LPG ID चा वापर करून

यामुळे तुमची सबसिडी थांबू शकते

LPG Cylinder price : जर तुम्हाला LPG ची सबसिडी मिळत नसेल, तर तुमचे LPG आधार क्रमांकाशी जोडला (LPG Aadhaar Linking) आहे का हे तपासून बघा

वेगवेगळ्या राज्यांमध्ये सबसिडीची रक्कम वेगवेगळी आहे. ज्या लोकांचे उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांना LPG सबसिडी मिळत नाही.

 

अशी तपासा सबसिडीची रक्कम

‘माय एलपीजी’च्या संकेत स्थळाला भेट द्या – क्लिक करा

या ठिकाणी 17 अंकी LPG ID नमूद करा

नोंदणीकृत संपर्क क्रमांक नमूद करा registered mobile number

कॅप्चा कोड भरा (captcha code)

तुमच्या क्रमांकावर OTP येईल

 

पुढील पानावर जाऊन आपला ईमेल आयडी नमूद करा

ईमेल आयडीवर आलेली एक्टिवेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे अकाऊंट एक्टिवेट होईल. 

यानंतर mylpg.in वर जाऊन लॉगइन करा

आधार क्रमांक एलपीजीला लिंक असेल याची खात्री  करा

त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred या पर्यायावर क्लिक करा

याठिकाणी आपल्याला आपल्या खात्यावर सबसिडी ट्रान्सफर झाली आहे की नाही. हे तपासता येईल

gas cylinders LPG cylinders cylinders subsidy गॅस सिलिंडर घरगुती सिलिंडर सबसिडी
English Summary: LPG Do you get subsidy on gas cylinders? Check immediately 17 march

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.