गेल्या काही दिवसांपासून शेतकरी(farmer) वर्गाला अनेक वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाऊस ऊन वादळ कीड रोगराई यांमुळे शेतकऱ्यांना भरपूर नुकसान सोसावे लागत आहे.त्याचबरोबर गेल्या वर्ष भरापासून कोरोना व्हायरस मुळे सुद्धा चांगले उत्पन्न मिळून सुद्धा बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला त्यामुळे मोठ्या अडचणीत शेतकरी वर्ग सापडला आहे.
वादळी वारे आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात केळीची पडझड:
परंतु कोरोना काळात फळांना चांगला भाव मिळत आहे. त्यामधील एक म्हणजे केळी. गेल्या काही दिवसांपासून केळी चे भाव हे कमी जास्त होताना आपल्याला दिसत आहेत. परंतु चांगल्या आणि उच्च प्रतीच्या मालाला चांगलाच भाव सुद्धा मिळत आहे.येणाऱ्या पावसाचा आणि अवखाळी पावसाचा सर्वात जास्त परिणाम हा फळ बागांवर झालेला दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी वादळी वारे आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात केळीची पडझड सुद्धा झालेली आहे.परंतु सणासुदीच्या काळात केळी ची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे बाजारपेठेत केळीला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे प्रति क्विंटल केळी मागे 20 रुपयांनी दर वाढ झालेली आपल्याला जळगाव जिल्ह्यतील बऱ्हाणपूर बाजारात बघायला मिळत आहे.तसेच बाजारात केळीला दर हा 1230 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळाला आपल्याला पाहण्यास मिळत आहे.
केळी उत्पादनात आपला भारत देश हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तसेच आपल्या देशात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र हे केळीच्या लागवडीसाठी आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडी साठी आहे यातील निम्मे क्षेत्र हेजळगाव मधील आहे.वर्षभर उपलब्ध होणाऱ्या केळीला बाजारात नेहमी मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या केळीला पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राज्यस्थान या राज्यांमधून मोठी मागणी आहे.महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यात पिकलेली केळी ही पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
तसेच केळी फळापासून टिकावू पूड, मुराब्बा, टॉफी, जेली अश्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. केळीच्या वाळलेल्या पानाचा उपयोग आच्छादनासाठी सुद्धा केला जातो. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर।केला जातो. त्यामुळे मध्यंतरी सर्वत्र झालेल्या पाऊसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे बाजारपेठेत केळी ची आवक कमी झाली आहे. त्याचा मोठा परिणाम हा केळीच्या दरावर झालेला आहे येणाऱ्या दिवसात सुद्धा केळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज सुद्धा व्यक्त केला आहे.
Share your comments