1. बातम्या

Bhu-sampadan: सोलापूर जिल्ह्यातील या महत्त्वाच्या रेल्वे मार्गासाठी 'या' गावातून होणार भूसंपादन सुरू? वाचा याबाबत महत्त्वाची माहिती

महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यामध्ये अनेक महामार्ग तसेच रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असून काही प्रकल्प हे प्रस्तावित आहेत. जे काही महामार्ग आणि महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत त्यांचे देखील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र मधून अनेक मोठ मोठे महामार्ग जात असल्यामुळे नक्कीच राज्यातील मोठ्या शहरांचे आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास देखील या माध्यमातून मदत होत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
land aquisition update for solapur osmanabad railway

land aquisition update for solapur osmanabad railway

 महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यामध्ये अनेक महामार्ग तसेच रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असून काही प्रकल्प हे प्रस्तावित आहेत. जे काही महामार्ग आणि महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत त्यांचे देखील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र मधून अनेक मोठ मोठे महामार्ग जात असल्यामुळे नक्कीच राज्यातील मोठ्या शहरांचे आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास देखील या माध्यमातून मदत होत आहे.

जर आपण यावर्षीचा अर्थसंकल्पाचा विचार केला तर रेल्वे विभागासाठी फार मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली असून महाराष्ट्रात देखील या माध्यमातून प्रस्तावित रेल्वे मार्गांना बऱ्यापैकी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच माध्यमातून जर आपण सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा विचार केला तर या बाबतीत देखील एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आली आहे.

 ही आहे या रेल्वे मार्गाबाबत महत्वाची अपडेट

 जर या रेल्वे मार्गाचा विचार केला तर यामुळे तुळजापूर तसेच पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोट सारखे जे काही धार्मिक स्थळे आहेत, यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणार असून यामुळे नक्कीच धार्मिक पर्यटनाला एक चांगली चालना मिळण्याची शक्यता आहे.

या रेल्वे मार्गाचा विचार केला तर यासाठी आवश्यक असणारे भूसंपादनासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी जवळपास पूर्ण झाली असून यामधून फक्त कसबे सोलापूर गावाची मोजणी बाकी आहे. परंतु कसबे सोलापूर येथील जमीन मोजणीचा जो काही प्रश्न आहे तो देखील येणाऱ्या आठ दिवसात निकाली काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जर आपण या रेल्वे मार्गाचा विचार केला तर हा रेल्वे मार्ग सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील एकूण नऊ गावात प्रस्तावित असून या रेल्वेमार्गासाठी जवळजवळ 185.42 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.  त्यामुळे पाच हजार 67 शेतकरी बाधित होणार आहेत. हा रेल्वे मार्ग खूप महत्वपूर्ण असून यामुळे पश्चिम महाराष्ट्र  आणि मराठवाडा हे एकमेकांना जोडले जाणार असून

या माध्यमातून धार्मिक पर्यटनच नाही तर कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला देखील फायदा होणार आहे. पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणच्या भाविकांना तुळजापूरला जाणे सोपे होणार असल्याचे देखील या माध्यमातून सांगितले जात आहे. अर्थसंकल्पामध्ये या रेल्वे मार्गासाठी 110 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या रेल्वेमार्गासंदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आले असून यावर काही हरकती असतील तर त्या मागवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांकडे 107 हरकती प्राप्त झाले आहेत. या रेल्वे मार्गामुळे  सोलापूर जिल्ह्यात खेळ आणि मार्डी हे नवीन रेल्वे स्टेशन देखील तयार होणार आहेत.

जर आपण या रेल्वे मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनाचा विचार केला तर जिल्ह्यातील सर्वच गावांमधून जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली असून लवकरच बाधित गावांमध्ये जमिनीचे संपादन केले जाणार आहे व रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा देखील आशावाद व्यक्त केला जात आहे.

English Summary: land aquisition update for solapur to osmanabad railway project Published on: 14 February 2023, 04:18 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters