1. बातम्या

सुरत चेन्नई महामार्ग साठी या जिल्ह्यात प्रकल्पासाठी 196 हेक्टर जमिनीचे थेट खरेदीने होणार संपादन

सुरत चेन्नई या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी सध्या भूसंपादनाचे काम चालू असून हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जात आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
surat chennai highway

surat chennai highway

सुरत चेन्नई या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी सध्या भूसंपादनाचे काम चालू असून हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जात आहे.

त्यामुळे नाशिक जिल्ह्यात या प्रकल्पासाठी 196 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून या जमिनीची संपादनाची प्रक्रिया ऑगस्टपासून थेट खरेदीने सुरू होणार आहे. यासाठी संयुक्त मोजणी सुरू करण्यात आली आहे.सुरत चेन्नई महामार्ग ची वैशिष्ट्य म्हणजेया दोन शहरातील असलेले 1600 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 1250 किलोमीटर पर्यंत येणार आहे. एवढेच नाही तर सुरत आणि नाशिक  या दोन शहरातील अंतर 176 किलोमीटर होणार  आहे. हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 609 गावांमधून जाणार आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.

या जिल्ह्यामधून जाणारे या मार्गाचे अंतर हे 122 किलोमीटर असून हा महामार्ग सुरगाना,पेठ, दिंडोरी, नासिक, निफाड आणि सिन्नर तालुक्यातून जाणार असून यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. या तालुक्‍यातील एकूण 69 गावांचा यामध्ये समावेश असून दिंडोरी तालुक्‍यातील सर्वाधिक 23 गावांचा समावेश आहे. ज्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहेत अशा जमिनींच्या जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त मोजणीचे काम जोरात सुरू झाले आहे. 

ही मोजणी येत्या जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर ऑगस्ट महिन्यात भूसंपादन प्रक्रियेला मुहूर्त लागेल.याभूसंपादन प्रक्रियेत जमिनीला किती मोबदला मिळेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नेमक्या कुठल्या दराने शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

English Summary: land acquisition by purchasing from farmer for chennai surat highway in nashik district Published on: 13 March 2022, 09:29 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters