जळगाव (जा.) : राज्यातील कृषी विज धारक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला दिवसा १० तास विज द्या.या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजु शेट्टी यांनी कोल्हापुर येथे महावितरण कार्यालया समोर गेल्या ९ दिवसांपासून आंदोलन चालु केले आहे. पंरतु शेतकऱ्यांसाठी चालु केलेल्या आंदोलनाची सरकार किंवा लोकप्रतिनीधींनी हे आंदोलन गांभीर्याने घेतले नसल्याने या कुंभकर्णी झोपेत असलेल्या
आमदारांना जागे करण्यासाठी राज्यातील सर्व आमदार व मंत्र्यांना स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्या कडुन निवेदन देण्यात येत आहेत.
जळगाव जा. मतदार संघात ३४ हजार पेक्षा जास्त कृषी विज धारक शेतकऱ्यांना महावितरण कंपनी रात्रीला विज पुरवठा करत असल्याने शेतकरी जिवाची बाजी लावून सर्व शेतकरी पिकाला रात्रीला पाणी देत आहेत. यामधे अनेक शेतकऱ्यांचे बळी सुध्दा गेलेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसा १० तास महावितरणने वीज पुरवठा करावा
या करीता स्थानिक आमदार संजय कुटे यांनी ४ मार्च रोजी सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात महावितरण विरोधात आवाज उठवुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. तसे न केल्यास जळगाव मतदार संघात सार्वजनिक कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा आमदार संजयजी कुटे यांच्या दि.२ मार्च रोजी निवासस्थानी जाऊन स्वाभिमानीचे विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकित दाभाडे व नितीन नलवाळे यांनी लेखी निवेदनातुन दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी चालु केलेल्या आंदोलनाची सरकार किंवा लोकप्रतिनीधींनी हे आंदोलन गांभीर्याने घेतले नसल्याने या कुंभकर्णी झोपेत असलेल्या आमदारांना जागे करण्यासाठी राज्यातील सर्व आमदार व मंत्र्यांना स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्या कडुन निवेदन देण्यात येत आहेत.
Share your comments