गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे घेण्यात न आलेल्या भारतातील अग्रगण्य कृषिथॉन प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून ते 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नाशिक येथील एबीबी सर्कल जवळील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात येणार आहे.
यासंबंधीची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली. नाशिक येथे आयोजित होणारे हे प्रदर्शन भारतातील अग्रगण्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते.
यामध्ये कृषी क्षेत्रातील नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान ची माहितीपर स्टॉल्स, शेती क्षेत्रातील जाणकारांशी भेटीगाठी, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण, पिकांची मार्केटिंग तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून या कृषीथॉन प्रदर्शनाकडे पाहिले जाते.
जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर विविध प्रकारची कृषी उत्पादने आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्याला देशात प्रसिद्धी मिळाली असून या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवनवीन घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना करून देण्यासाठी 1998 पासून कृषीथॉनचे आयोजन करण्यात येत आहे.
यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीच्या उद्योगांची कृषी उत्पादनांना व नवनवीन संशोधन करणाऱ्या संस्थांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
एवढेच नाही तर शेती व्यवसायाची संबंधित संस्थांना भेट देऊन त्यांच्या गरजांची माहितीचे संकलन सुरू झाले आहे.
नक्की वाचा:शेतीपूरक व्यवसायातून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या नेमकं करायचं तरी काय..
काय असेल कृषीथॉन प्रदर्शनामध्ये?
या वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रदर्शनात कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले राज्य, देश आणि परदेशातील नामांकित 300 पेक्षा जास्त कंपन्या व संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत.
कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे, विविध प्रकारची कृषी अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक व तुषार सिंचन, फवारणी यंत्र उत्पादक कंपन्या, विमा क्षेत्रातील कंपन्या तसेच बँका, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे,
कृषी विज्ञान केंद्रे, विविध कृषी पूरक उद्योग, रोपवाटिका तसेच अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादींचा सहभाग या प्रदर्शनात असणार आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी www.krushithon.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा:Agri Bussiness: वर्मी कंपोस्ट करा तयार अन विकून कमवा बक्कळ नफा,वाचा माहिती
Share your comments