1. बातम्या

कृषी दिन साजरा होतो एक जुलैला, काय आहे या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास?

KJ Maharashtra
KJ Maharashtra
krushi day

krushi day

 महाराष्ट्रात आज इकडे कृषी दिवस साजरा करण्यात येत आहे. राज्यात दरवर्षी 1 जुलैला कृषी दिवस साजरा करण्यात येत असून एक जुलै ते सात जुलै या दरम्यान कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.

 कृषी दिवस हा कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक त्यांनी कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मानार्थ कृषी दिवस साजरा केला जातो.

 आपल्या भारताची अर्थव्यवस्था आणि राज्याची अर्थव्यवस्था ही सर्वात जास्त प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.

 त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून ते  आतापर्यंत शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर होऊन  शेतीचा विकास होत गेला. महाराष्ट्र राज्य ही शेती क्षेत्रात अग्रगण्य   राज्य म्हणून ओळखले जाते. यामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान आहे. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र मध्ये हरितक्रांती आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल, राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसे करता येईल? विशेष लक्ष केंद्रित करून त्यादृष्टीने प्रयत्न केले.

 माननीय वसंतरावजी नाईक का राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात राज्यात विविध कृषी विद्यापीठांचे आणि विविध कृषी संबंधित संस्थांची स्थापना  झाली. 1972 मध्ये राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या वेळी त्यांनी शेती क्षेत्रासाठी विविध उपाय योजना राबविल्या.

शेतकऱ्यांना संकरित बियाणे उपलब्ध करून दिली, जलसंधारण यासारख्या महत्त्वपूर्ण कामात लक्ष केंद्रित करून जलसंधारणाची कामे वाढवली व त्या माध्यमातून शेतीला शाश्‍वत विकासाचा मार्ग दाखवून शेती  प्रगतीपथावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचा परिणाम आपल्याला आज दिसत आहे. म्हणून पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत अग्रगण्य  म्हणून ओळखले जाते. अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या योगदानाचा स्मरणार्थ एक जुलै हा दिवस राज्यात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters