शेतकरी, गरीब, वंचित कुटुंबांच्या दारात शिक्षणाची ज्योत पोहोचविण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने खास योजना सुरु केली आहे.प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना, असं या योजनेचं नाव.. मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी शिष्यवृत्ती योजना.. पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाते.
सोबतच त्यांच्या राहण्याची, तसेच जेवणाचीही मोफत व्यवस्था केली जाते.Along with this, their accommodation and meals are also provided free of charge.Advertisementपीएम शिष्यवृत्ती योजनेत नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 75000 रुपये शिष्यवृत्ती मिळते, तर अकरावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठीच्या अटी खालीलप्रमाणे…शिष्यवृत्तीसाठीच्या अटीसंबंधित विद्यार्थी भारताचा रहिवासी असणं आवश्यक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा
कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो.शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. त्यानंतरच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो.शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागतो. सोबत बँकेच्या पासबूकची छायाप्रत जोडणे आवश्यक.
अर्ज कसा करावा?– पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://socialjustice.gov.in/ वर जावे.– होमपेजवर ‘पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम’च्या लिंकवर क्लिक करा.– तेथे तुमची नोंदणी करा. नोंदणी क्रमांक व पासवर्ड फोनवर एसएमएसद्वारे पाठवला जातो.– अर्जाचा फॉर्म पूर्णपणे भरा, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.– आता तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
Share your comments