मध्यरेल्वेच्या नागपूर विभागाचा विचार केला तर आतापर्यंत २३ किसान रेल्वे देशातील दिल्ली आणि शालीमारला पाठवण्यात आल्या. या रेल्वेतून १४.६१ कोटींचे उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले. तसेच या किसान रेल्वेचा फायदा संत्रा उत्पादकांना झाला.
केंद्र शासनाने सुरू केलेली किसान रेल्वे मुळे संत्रा तसेच अन्य कृषी उत्पादने व नाशवंत वस्तू देशाच्या अन्य राज्यांमध्ये पाठवण्यासाठी किसान रेल्वेची सेवा फायदेशीर ठरत आहे. यामध्ये विशेष असे की, शेतकऱ्यांना आपला माल पाठवण्यासाठी वाहतुकीवर ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे पाच वाजता खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते.
हेही वाचा : अरे व्वा ! आता इंधनावर अवलंबून राहणं होणार कमी; होणार इथेनॉलची निर्मिती
सोबत वेळेची बचत होत असल्याने पाठवलेला माल नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचतो व कृषिमाल खराब होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मालाचा दर्जा टिकून राहात असल्याने मालाला योग्य भाव मिळत आहे. किसान रेल्वेमधून ५ किलो पासून कितीही माल पाठवण्याची सुविधा असल्याने शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे.
जर नागपूर विभागाचा विचार केला तर किसान रेल्वेच्या नागपूर विभागातून झालेल्या २३ फेऱ्या मधून आतापर्यंत जवळजवळ ४ हजार टनांहून अधिकचा शेतमाल दिल्ली आणि कोलकाताला पाठवण्यात आला. किसान रेल्वेची सेवा सरकारने ८ ऑगस्ट २०२० पासून सुरू केली होती. नागपूरला या सेवेचा प्रारंभ १४ ऑक्टोबर २०२० ला झाला.
Share your comments