1. बातम्या

किसान क्रेडिट कार्डधारकांनो ! वीस दिवसात परत करा कृषी कर्ज ; अन्यथा...

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


किसान क्रेडिट कार्डधारकांनी बँकेकडून कृषी कर्ज घेतले असले तर त्यांच्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड अर्थात केसीसी धारकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देत असते. याशिवाय या कार्डच्या माध्यमातून शेतकरी शेतीसाठी लागणारी साहित्य , खते , अवजारेंची खरेदी करत असतो. याशिवाय सरकारने आता १० टक्के रक्कम घरगुती खर्चासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे.

परंतु किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी 31 ऑगस्ट तारीख फार महत्त्वाची असणार आहे. कारण या तारखेपर्यंत केसीसी धारकांना कृषी कर्ज परत करावे लागणार आहे. जर वेळेत कर्जाची परत फेड केली नाही तर शेतकऱ्यांना ४ टक्क्यांच्या  व्याजाऐवजी  ७ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांना या कर्जावर ३१ ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी सरकारने दिली ाहे.  जर शेतकऱ्यांनी यावेली रक्कम भरली नाही तर अतिरिक्त ३ टक्के अधिक व्याज द्यावे लागेल.  दरम्यान किसान क्रेडिट कार्डधारकांना ३१ मार्चपर्यंत कर्ज परत करावे लागते. त्यानंतर शेतकरी पुढच्या वर्षासाठी पुन्हा पैसे घेऊ शकतो.  काही शेतकरी  चालू असलेले  कर्ज वेळेवर परत करुन व्याजदरात सवलत मिळवत असतात आणि नंतर पुन्हा नवीन वर्षासाठी नव्याने कर्ज काढत असतात.  अशा कल्पननेमुळे बँकेत शेतकऱ्यांचा व्यवहार व्यवस्थित राहत असतो. 

किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज घेण्यासाठी काही अटी आहेत. आपण बऱ्याच वेळा तक्रार करतो की, कार्ड मिळाले पण बँका त्या कार्डवर कर्ज देत नाहीत अशी तक्रार आपण करत असतो. परंतु त्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे कर्जासाठी अर्ज करताना आपल्याला कार्डची क्रेडिट हिस्ट्री दाखवावी लागेल. म्हणजे आपल्याकडे कोणते कर्ज थकीत नाहीत ना याची शाश्वती यातून बँक कर्मचारी करत असतात.  आपला व्यवहार चांगला राहिला तर आपल्याला नवीन कर्ज मिळण्यास सुलभ जाते.   दरम्यान लॉकडाऊन मुळे मोदी सरकारने पैसे परत करण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवली . नंतरही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने परत मुदत वाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.

काही सेंकदात मिळवा किसान क्रेडिट कार्ड

 शेतकरी किसान योजनेचा लाभ घेत आहेत आणि ज्यांच्याकडे https://pmkisan.gov.in/ लिंक आहे ते किसान क्रेडिटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा जो या योजनेचा लाभार्थी नाही तोही या संकेतस्थळावर जाऊन कार्ड घेऊ शकतो.  या क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक होमपेज दिसेल. त्यावर केसीसी डाऊनलोड असा एक पर्याय असेल तो निवडावा लागेल. त्यानंतर विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल. या लिंक व्यतिरिक्त तुम्ही या संकेतस्थळावरुन https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf. अर्ज मिळवू  शकता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters