अहमदनगरमधील शेतकऱ्यांची ‘किसान कनेक्ट’ ऑनलाईन मंडई

30 July 2020 12:47 PM


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशात  तीन चार महिन्यापासून लोकडाऊन सुरू होता. आता सरकारने अनलॉक केले आहे पण तरीही बरेच ग्राहक हे भीतीपोटी बाजारपेठेत येत नाहीत. यामुळे बाजारात शेतमालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांपुढे माल विक्रीची मोठी समस्या आहे. पण  या  परिस्थितीत अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केलेला आहे.  या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट शेतातील भाजी फळे पोहोचवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या सेलिब्रिटींनी घरबसल्या भाजी पाला मागवला.  सध्याच्या शेती क्षेत्रात आधुनिकता आली आहे, त्यातच सोशल मीडियाचा वापर केला तर बरेच अशक्य गोष्टी या पूर्णत्वास नेऊ शकतात.  याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मधील आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांची यशस्वी ठरलेला प्रयोग.

या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आपल्या शेतातून थेट मुंबई-पुण्याच्या वा अन्य शहरातील जमलेल्या शेकडो ग्राहकांना भाजीपाला पोहोचवला.  आधुनिक तंत्रज्ञान वापरून या भागातील शेकडो शेतकरी एकत्र आले व त्यांनी किसान कनेक्ट या ऑनलाईन मंडईची स्थापना केली आहे. लोकडाऊन काळात अनेक फळभाजी पुरवठादार व विक्रेते उद्यमशील व्यक्ती व नव उद्योग स्थापन करू इच्छिणाऱ्यांनी ऑनलाइन घरपोच भाजीपाला व फळे विक्रीचा उद्योग सुरू केला आहे. घरातून बाहेर पडू न शकणार्‍या लोकांसाठी ही सोय असली तरीही या प्रकारच्या भाजीपाला व फळे पुरवठ्यात त्रुटी आहेत.  यातील अनेकजण शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतात व भाजीपाल व फळांचा साठा करून ठेवतात.  

फळांचा साठारून मागणीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पुरवठा करीत राहतात.  यात ग्राहकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला ताजा, पोषणमूल्य टिकून असलेल्या व स्वच्छ भाजीपाला मिळत नसल्याने ग्राहक वंचित राहिले आहेत.  यादृष्टीने ग्राहकांना ताजा शेतमाल कसा मिळेल व कमीत-कमी वेळेत थेट शेतातून तो ग्राहकांच्या दारापर्यंत कसा पोहोचेल.  याचा विचार करून या शेतकऱ्यांनी किसान कनेक्ट या कार्यक्रमातून ही गरज पूर्ण करून दाखवले.

 


अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन किसान कनेक्ट या शेतकरी उत्पादक कंपनीची अलीकडे स्थापना केली असून कमीत कमी वेळेत ताजा शेतमाल घरपोच पोहोचविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.  शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर एवढा मोठा मंच उभा करण्याचा हा अहमदनगर जिल्ह्यातील पहिलाच प्रयत्न आहे.  मुंबई पुणे नाशिक अहमदनगर या शहरातून आलेल्या शेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमांमध्ये अनेक तरुण सुशिक्षित प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी एकत्र येऊन त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करीत भाजीपाला व फळांचे वितरण करण्याची व्यवस्था केली आहे. यात आधुनिक मशागत पिकांनी प्रक्रिया बरोबर मालाचे वर्गीकरण बास्केट पॅकिंग व ग्राहक केंद्राच्या मदतीने विनाविलंब २४ तासात ग्राहकांच्या दारी भाजीपाला पोहोचवण्यासाठी शेतकरी भर देत आहेत. गेल्या तीन महिन्यात किसान कनेक्टने  सुमारे ८० ते ८५ हजार फळभाज्यांचे बास्केट मुंबई पुणे वा अन्य ठिकाणी वितरित केले आहेत.

Kisan Connect Kisan Connect online market Ahmednagar Ahmednagar farmers corona virus lockdown कोरोना व्हायरस लॉकडाऊन किसान कनेक्ट ऑनलाईन मार्केट ऑनलाईन मंडई अहमदनगर
English Summary: Kisan Connect online market for farmers in Ahmednagar

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.