1. बातम्या

खरीप हंगामात पिकांच्या लागवडीचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले

देशात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग धंदे बंद झाले आहेत, तर काहींना आपल्या व्यवसाय करण्यास अडचणी येत आहेत. अशा स्थिती कृषी क्षेत्रातून एक आनंदाची बातमी हाती आली आहे. सध्या मॉन्सूनही बळीराजाला साथ देत असून कृषी व्यवसायासाठी निश्चितच सुखावणारी गोष्ट आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग धंदे बंद झाले आहेत, तर काहींना आपल्या व्यवसाय करण्यास अडचणी येत आहेत. अशा स्थिती कृषी क्षेत्रातून एक आनंदाची बातमी हाती आली आहे. सध्या मॉन्सूनही बळीराजाला साथ देत असून कृषी व्यवसायासाठी निश्चितच सुखावणारी गोष्ट आहे.  देशाच्या ७० टक्के भागात मॉन्सूनने धडक मारली आहे. मॉन्सूनचा पाऊस होताच पेरणींच्या कामांना सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या १९ दिवसातच २३ लाख हेक्टर इतकी पिकांची लागवड झाली आहे. यावेळी खरीप हंगामात रेकॉर्ड बनवणारी लागवड होत आहे.

कृषी मंत्रालयाने याविषयीची आकडे सादर केले आहेत, या आकड्यांनुसार दक्षिण - पश्चिम मॉन्सून हंगामाच्या पहिल्या १९ दिवसात खरीप पिकांच्या लागवडीत वाढ झाली आहे. भाताची लागवड १०.०५ लाख हेक्टर झाली आहे.  याचा सरासरी अंदाज हा २.५० लाख हेक्टर पेक्षा जास्त आहे. डाळीची लागवड ही ४.५८ लाख हेक्टर परिसरात झाली आहे. सरासरीनुसार, ०.६४ लाख हेक्टरपेक्षा कमी आहे. दरम्यान एकूण खरीप पिकांची लागवड ही १३१.३४ लाख हेक्टरच्या परिसरात झाली आहे. सरासरीनुसार ते २२.९३ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. म्हणजेच आतापर्यंत ही वाढ २१.१५ टक्के झाली आहे. अर्थव्यवस्थेसाठी हे चांगली बातमी आहे, कोरोना व्हायरससारख्या संकटात अनेक उद्योग बंद पडले आहेत.

जर कृषी क्षेत्र या वेगाने विकास करेल तर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कृषी क्षेत्र फार मोठी भूमिका निभावणार असल्याचे मत अर्थशास्त्रज्ञ वेद जैन यांनी एका वृत्तसंस्थेळा सांगितले.  जर आपण १९ जूनपर्यंत झालेल्या लागवडीची तुलना मागील वर्षाच्या लागवडीशी केली तर ही वाढ ४० पेक्षा जास्त आहे. लॉकडाऊनचा फटका सहन केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील लागवडीची बातमी ही सुखकारक आहे. जर मॉन्सूनचा जोर कायम असाच राहिला तर शेतीतील उत्पन्नही चांगले होईल. कमाई अधिक होईल आणि ग्रामीण भागातील परिस्थिती सुधरेल.

English Summary: kharif sowing number increased by 40 percent Published on: 24 June 2020, 03:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters