सध्या राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्याकडे पावसाने मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली आहे. भर पावसाळ्यात पाऊसच गायब झाल्याने शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशातच पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात आज सकाळपासून पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे असाच पाऊस अजून काही दिवस पडला तर पिके जगणार आहेत.
राज्यातील पावसासंदर्भात पुणे हवामान खात्याकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे आज असाच पाऊस पडेल.
चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडरा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, सातारा, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
पॉलिहाऊसमध्ये गुलाबाची लागवड करा आणि कमवा जास्तीचे पैसे
आजपासून पुणे आणि मुंबईमध्ये पावसाला चांगलीच सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडमधील खोपोलीमध्ये शुक्रवारी रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच रत्नागिरीमध्ये देखील पावसाला सुरुवात झाली आहे.
या दोन प्रकारच्या फुलकोबीची वर्षभर लागवड करा, लाखोंची कमाई होईल...
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, शरद पवार यांनी आखला थेट जालना दौरा, आज घेणार जखमी आंदोलकांची भेट...
Share your comments