Kanda Bajar Bhav: कांदा उत्पादक बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, सध्या कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी कांदा दरात (Kanda Bajar Bhav) मोठी घसरण झाली होती. पण आता कुठेतरी समाधानकारक कांद्याला दर मिळत आहे.
राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज सहा वाजेपर्यंत आलेल्या कांद्याच्या बाजारभावानुसार कांद्याला सर्वाधिक चार हजार रुपये दर मिळाला असून सोलापूर व पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत हा दर मिळाला आहे.
हेही वाचा: ''विठ्ठल हा सामान्य माणसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव''
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 23,196 क्विंटल लाल कांद्याची (कांदा बाजार भाव) आवक झाली असून यासाठी किमान भाव 100 रुपये, कमाल भाव 4000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये आहे.
हेही वाचा: मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही : कृषिमंत्री अब्दुल सत्तार
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची 16 हजार 500 क्विंटल आवक झाली असून, यासाठी किमान भाव 700 रुपये, कमाल भाव 4000 रुपये तर सर्वसाधारण भाव 2600 रुपये आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळ कांद्याची (कांदा बाजार भाव) 52 हजार 434 क्विंटल आवक झाली असून ही आजची सर्वाधिक आवक असून त्यासाठी किमान भाव 1800, कमाल भाव 3400 आणि सर्वसाधारण भाव 2600 इतका आहे.
हेही वाचा: बेरोजगार मजुरांसाठी सरकार देणार 5000 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
हेही वाचा: धडाकेबाज कारवाई! पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित
Share your comments