
वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारा हा फोटो आणि घाम फोडणारी संघर्षगाथा, जरा बघा आणि वाचाच
सुई जेव्हा चालते तेव्हाच सुंदर पोशाख बनतो त्याचप्रमाणे एखाद्या समूहातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या रूपाने सतत कामांची धडपड करत असलेली सुई म्हणजे सलाम किसान समूहातील मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे सर!आविश्रांत अक्षय खोब्रागडे सर त्यांचा कामाचा सपाटा आणि कोणत्याही परिस्थितमध्ये कायम असलेला उत्साह हा अनेकांची मनं वेधून घेणारा आणि कधी कधी घाम फोडणारा आहे.देवाने प्रत्येकाच्या हातावर रेषा दिलेल्या आहेत त्या
रेषा भविष्याच्या असतात असं आपण मानतो परंतू कदाचित तस नसावं कारण अक्षय सरांकडे बघितल्यानंतर समजतं की हातावरील रेषा आपल्याला वेगवेगळ्या रंगांनी भराव्या लागत असतात.We have to fill the lines on the hand with different colors.अक्षय खोब्रागडे सर सलाम किसान समूहाचे जरी मुख्य कार्यकारी अधिकारी असले तरीसुद्धा समूहातील कितीही खालच्या थरातील काम असले आणि कोणत्याही कौशल्याचे काम असले तरी सुद्धा हे अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्वच कामात अगदी प्रवीण असल्याची भूमिका ते पार पाडताना दिसतात.वेळ
पडली तर समूहातील सर्वच जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलल्या आहेत आणि सद्यस्थितीतही ते त्याच पद्धतीने काम करत आहेत.अक्षय सरांनी त्यांच्या कारकिर्दी मध्ये अनेक चढउतार पाहिले. अगदी आईच्या पोटामध्ये असताना वडिलांची छत्रछाया त्यामुळे वडिलांचे प्रेम काय असते वडिलांचा आधार काय असतो याची जराही झुळूक त्यांना लागली नाही त्यामुळे पितृत्वाची ची छाया त्यांना मिळालीच नाही. समाजामधील टोचणाऱ्या काट्यांना आणि समाजातील लोकांच्या टोमण्यांना सामोरे जावे लागले. बालपण ते माध्यमिक
विद्यालयाचा जीवन प्रवास अत्यंत खरतड म्हणजे प्राथमिक - माध्यमिक शिक्षण हे आदिवासी शाळेमध्ये घेतले त्या ठिकाणी नक्षलवादी भाग असल्यामुळे शिकविनारे शिक्षकही मर्यादित होते. अस्याच जीवनातील वेगवेगळ्या अडचणी समजून घेता त्यांनी ठरवले की शिक्षणातूनच समोर काहीतरी मोठे व्हायचे त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. त्यानंतर त्यांनी इयत्ता चौथी च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून पहिला नंबर पटकाविला त्यानंतर न थांबता दहावी मध्येही सुद्धा पहिला नंबर पटकावून एक उदाहरण मांडले.बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इंजीनियरिंग आणि MBA चे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी ठरवले की आपल्या जे काय करायचे ते आपल्या मातीसाठीच करायचे आहे.
तंत्रज्ञानाची साथ सोबत असतानाही त्यांनी सामाजिक कार्य विविध संस्थेसोबत केले आणि मग ठरवले की करायचे ते कृषी क्षेत्रासाठी त्यानंतर त्यांनी आय.आय.टी, मुंबई टीम अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक इनोव्हेटिव्ह आणि अफोरडेबल कोल्ड स्टोरेज बनवले. हे यंत्र केवळ चार सेंटीमीटर च्या TEC प्रणाली वर सौर ऊर्जे मार्फत चालणारे होते. या यंत्राचे तब्बल २ वर्षाच्या चाचणी नंतर लक्षात आले की शेतकऱ्यांना माफक किमती मध्ये कमी विजेचा वापर करून बी बियाणे २ वर्षापर्यंत पूरक परिस्थिती मध्ये साठविता येतात. हे यंत्र एवढे यशस्वी झाले आणि अनेकांना आवडले सुद्धा नंतर मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते अक्षय खोब्रागडे यांना युवा संशोधन पुरस्काराही देण्यात आला.
त्यांनतर अक्षय सरांना शासनासोबत काम करण्याची संधी मिळाली, वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत कामही केले.आय.आय.टी. मध्ये ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सीएसआर बॉडी मध्ये काम करण्यासाठी उतरले आणि ग्रामीण भागातील लोकांचे भविष्य उज्वल केले. अक्षय यांना तेवीस राज्यांमध्ये ग्रामीण भागातील लोकांचे भविष्य उज्वल करण्यासाठी काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये त्यांनी मुख्यतः मूल्यवर्धक उत्पादने, मधुमक्षिका, पालन मासे पालन, यावर उत्कृष्ट काम केले.त्यानंतर त्यांना सरकार आणि समाज यामध्ये त्यांना सल्लागार म्हणून नोकरी मिळाली. उत्तर प्रदेश
सरकारसोबत कृषी व्यालू चैन मध्ये तब्बल ४० जील्यांमधे जवळपास बारा तेलवर्गीय,भाजीपाला आणि डाळ या वेगळ्या वर्गीय पिकांवरती काम केले.शेतकऱ्यांचा विकास ग्रामीण भागाचे विकास आणि तरुणांचा सर्व बाजूंनी विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते जीवनाचा प्रवास करत आहेत.त्यानंतर सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या उद्देशावर काम करत असल्याने त्यांची दृष्टी सलाम किसान च्या विचारांसोबत जुळून आली. सरकारसोबत काम करण्याची संधी आणि महिन्याला
लाखोंचा पगार सोडून त्यांनी त्यांच्या विचारसरणीवर ठाम राहत सलाम किसान या समूहाशी जोडण्याचा विचार केला आणि आता सलाम किसान या समूहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर ते कार्यरत आहेत.सलाम किसान ला ते नव्याने उभारी देण्याचे काम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि भारतातील तरुणांसाठी ही संघर्ष करता नक्कीच प्रेरणादायी ठरेल त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटांना चकवा देऊन यशस्वी जीवनाची कारकिर्द सुरुच आहे. अक्षय खोब्रागडे सर यांच्याकडे पाहिलं की अनेकांना नक्कीच जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल.
लेखक - गोपाल उगले
Share your comments