तुम्ही जर व्यवसाय करण्याच्या नादात असाल तर तुम्हाला खूप अडचणी येत असतील जसे की जास्त भांडवल. तुम्ही असा विचार करत असाल की कमी गुंतवणूक करून जास्त कमाई कोणत्या व्यवसायमधून भेटू शकते.व्यवसाय म्हणले की खूप भांडवल लागते मात्र असे काय व्यवसाय आहेत जे कमी पैशात चालू करू शकता आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात फायदा घेऊ शकता. असाच एक व्यवसाय आहे की तुम्ही १ लाख गुंतवणूक त्यामधून दरमहा १० लाख रुपये कमवू शकता जो की हा व्यवसाय शेतीशी निगडित आहे.
1 लाख गुंतवून 10 लाखापर्यंत कमवा:-
सध्याच्या युगात जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मशरूम शेती चा व्यवसाय खूप फायद्यात ठरेल जे की या व्यवसायात तुम्ही खर्च जो केलेला आहे त्याच्या दहा पटीने पैसा कमवू शकता, याचा अर्थ असा होतो की तुम्ही १ लाख रुपये गुंतवणूक १० लाख रुपये कमवू शकता.मागील काही वर्षांपासून मशरूम ची मागणी खूप वाढलेली आहे जे की सध्याची मागणी पाहता मशरूम लागवड करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. परंतु मशरूम लागवड साठी किती खर्च येईल आणि काय करावे लागेल ते आपण जाणून घेऊया.
हेही वाचा:“सेंद्रिय कर्बचे अनुकूल परिणाम”
मशरूमची लागवड कशी केली जाते:-
बाजारात जास्त मागणी बटन मशरूम ची आहे. बटन मशरूम ची लागवड ऑक्टोबर ते मार्च या कालावधीमध्ये केली जाते. गहू, तांदळाचा पेंढा आणि काही रसायनांमध्ये मिसळून कंपोस्ट खत मशरूम तयार करता येते. जवळपास १ महिना कंपोस्ट खत तयार करण्यास लागतो. यानंतर तुम्ही मशरूम बियाणे राठ जागेवर जवळपास ६ ते ८ इंचाचा थर लावून लावावे. मशरूम च्या बिया कंपोस्ट ने झाकल्या जातात.यानंतर ४०-५० दिवसात मशरूम तयार होऊन त्याची कापणी करून विक्रीसाठी घेऊन जाऊ शकता. मशरूम च्या शेतीची लागवड उघड्यावर न करता शेड मध्ये केली जाते.
किती खर्च आणि किती नफा:-
एक किलो मशरूम साठी तुम्हाला जास्तीत जास्त २५ ते ३० रुपये खर्च येतो पण तेच मशरूम जर तुम्ही बाजारात विकण्यास घेऊन गेला तर प्रति किलो २५० ते ३०० रुपये ला विकले जातात. तसेच मोठ्या शहरांमध्ये जे रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स आहेत त्यास तुम्ही प्रति किलो ५०० रुपये मशरूम विकू शकता.
काय लक्षात ठेवले पाहिजे:-
१५ ते २२ अंश सेंटिग्रेड तापमानात मशरूम उगवते.
८० ते ९० टक्के लागवड करण्यासाठी ओलावा असावा.
कंपोस्ट खूप महत्वाचे आहे कारण यामुळेच चांगले मशरूम येऊ शकते.
जुन्या बिया घेऊ नका नाहीतर उत्पादनावर परिणाम होईल.
बाजारात ताज्या मशरूम ची किमंत जास्त आहे त्यामुळे तयार होताच ते विका.
Share your comments