बारावी उत्तीर्णांना महावितरणमध्ये नोकरीची संधी ; ७ हजार जागांवर होणार भर्ती

25 February 2021 07:28 PM By: भरत भास्कर जाधव
महावितरण मध्ये नोकरीची संधी

महावितरण मध्ये नोकरीची संधी

ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र सरकारची वीज वितरण कंपनी महावितरणमध्ये तब्बल ७ हजार पदांवर जम्बो भरती केली जात आहे. विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक अशी ही पदे आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) ने या भारती संदर्भातील जाहीरात दिला आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत २० मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवार mahadiscom.in या महाडिस्कॉमच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरू शकतात. ७ हजार पदांपैकी ५ हजार पदे विद्युत सहाय्यकांची तर २ हजार पदे उपकेंद्र सहाय्यकांची आहेत.

पदांची प्रवर्गनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे -

प्रवर्ग - विद्युत सहाय्यक -- उपकेंद्र सहाय्यक

सर्वसाधारण - १६३७ -- ६५६

महिला - १५०० -- ६००

क्रीडापटू - २५० -- ९८

माजी कर्मचारी - ७५० -- ३००

प्रकल्पग्रस्त - २५० -- ९९

भूकंपग्रस्त - ९९ -- ४०

शिकाऊ उमेदवार - ५०० -- २०१

अनाथ - १४ -- ६

एकूण - ५००० -- २०००

वयोमर्यादा

सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ. माजी कर्मचारी आणि दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे.

 

MAHADISCOM Recruitment 2021 साठी पात्रता

उमेदवारा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. सोबत बिझनेस स्टोरीजचे नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेंटर) किंवा इलेक्ट्रिशिअन / टर्शिअरी दोन वर्षांचे पदविका प्रमाणपत्र आवश्यक.

अर्जांचे शुल्क

अर्ज नि:शुल्क आहे.

 

वेतन श्रेणी

 विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक पदाची वेतनश्रेणी १८ हजार ते २७ हजार रुपये मासिक आहे.

 

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा आणि मुलाखतींद्वारे निवड केली जाईल.

MAHADISCOM Recruitment 2021 साठी अर्ज करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

https://ibpsonline.ibps.in/msedcusfeb21/

recruitment MSEDCL MSEDCL jobs MSEDCL recruitment महावितरण मध्ये नोकरीची संधी महावितरण महाराष्ट्र सरकारची वीज वितरण कंपनी
English Summary: Jumbo recruitment for 7000 posts in MSEDCL; Opportunity for 12th passers

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.