भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी; ३८५० जागांसाठी होणार भरती

28 July 2020 02:34 PM By: भरत भास्कर जाधव


SBI CBO Recruitment 2020: भारतीय स्टेट बँकने सर्कल बेस्ट ऑफिसर पदासाठी भरती काढली आहे. साधरण ३८५० जागा एसबीआय भरणार आहे. तीस वय वर्ष असलेले उमेदवारही या पदासाठी अर्ज करु शकतील. अर्ज करणारा उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा. या पदासाठी अर्ज करणारे एससी/ एसटी वर्गातील आणि पीडब्ल्यू वर्गातील उमेदवारांना अर्जासाठी कोणताच शुल्क नाही. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाईटवर जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करु शकता.

वेबसाइट: sbi.co.in
पदाचे नाव - सर्कल बेस्ट ऑफिसर (CBO)
पदांची संख्या - ३८५०
वेतन - २३, ७०० रुपये प्रतिमाह
शैक्षणिक योग्यता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण असणे.
वयाची मर्यादा - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० च्या खाली असावे. वयाची मर्यादा गणना १ ऑगस्ट २०२० च्या आधारवर केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - २७ जुलै २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ ऑगस्ट २०२०
अर्जासाठी शुल्क जमा करण्याची तारीख - १६ ऑगस्ट २०२०

अर्ज शुल्क -

या पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य/ खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी ७५० रुपये जमा करावे लागतील. तर एससी/ एसटी पीडब्ल्यू वर्गातील उमेदवारांसाठी निशुल्क आहे. अर्ज शुल्क आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, इंटनेट बँकिगद्वारे करू शकता.
अर्ज प्रक्रिया - या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जातील. अर्जासाठी उमेदवारांना स्टेट बँक इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिल्या गेलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाचे एक प्रत प्रिंटआऊट काढून आपल्या जवळ ठेवा.

निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केले जाणार आहे.

State bank of india State Bank of India opportunities in State Bank of India SBI CBO Recruitment sbi recruitment भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भारतीय स्टेट बँक सर्कल बेस्ट ऑफिसर भरती SBI मध्ये नोकरीची संधी
English Summary: Job opportunities in State Bank of India, recruitment for 3850 posts

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.