सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना बँकिग क्षेत्रात काम करण्याची आवड आहे, अशा उमेदवरांसाठी बँक ऑफ इंडियाने अर्ज मागविले आहेत. बँक ऑफ इंडियामध्ये २१४ अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या अंतर्गत इकॉनॉमिस्ट, स्टेटिस्टिशियन, रिस्क मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर यांच्यासह इतरही पदेही भरण्यात येणार आहेत. या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी अधिकृत सूचना एकदा वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या पदांवरील सर्व उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या वेवसाईटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करु शकतात.
हेही वाचा : देशातल्या पाच बँकांमध्ये मोठी भरती; त्वरीत करा ऑनलाईन अर्ज
शैक्षणिक पात्रता -
इकॉनॉमिस्ट च्या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्थशास्त्र मध्ये पीएचडी पदवी किंवा ५ वर्षात विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे दिली आहे.
महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाईन अर्ज प्रारंभ तारीख - १६ सप्टेंबर २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - ३० सप्टेंबर २०२०
अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख - ३० सप्टेंबर २०२०
एससी , एसटी पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी १७५ रुपये जमा करावे लागतील. याशिवाय सर्वसाधरण आणि इतर प्रवर्गातील लोकांना ८५० रुपये जमा करावे लागतील. अर्ज फी डेबिट कार्ड, नेट बँकिगद्वारे भरता येईल.
अर्ज प्रक्रिया - वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाईट www.bankofindia.co.in/career वर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करतात. निवडलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाईन चाचणी किंवा जीडी वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
Share your comments