1. बातम्या

Ration Card बनविण्यात अडचण येते का ? मग करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार ; जाणून घ्या ! प्रक्रिया


रेशन कार्ड हे स्वस्त दरात अन्नधान्य मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे.  याशिवाय शासकीय कामांसाठी पुरावा म्हणून रेशन कार्डचा उपयोग केला जातो.  पण रेशन कार्ड काढताना बहुतेकांना अडचणी येत असतात. एकतर अर्ज करताना आपल्याकडून काही चुकी झाली तर आपल्या रेशन कार्डचा अर्ज बाद करण्यात येतो. तर कधी कधी सरकारी अधिकारी आपल्या अर्जाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असतात.  जर चुका असल्यातर  आपण त्यात सुधारणा करुन परत अर्ज करू शकतो.  पण अधिकारीचा बेजाबादारपणा असेल तर त्यांच्या विरोधातही आपल्याला तक्रार करता येते. आणि ही तक्रार आपण विभागासह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करू शकतो.  याची काय प्रक्रिया आहे, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

येथे करा तक्रार

रेशन कार्डच्या माध्यमातून आपल्याला स्वस्त अन्न धान्य दुकानात कमी दरात धान्य मिळत असते. यासह शासकीय कामातही रेशन कार्डचा उपयोग होत असतो.  राज्य सरकारांकडून रेशन कार्ड दिले जात असते, जर आपल्याला काही तक्रार असेल तर आपण तुम्ही आपल्या राज्य अन्न पुरवठा विभागात याची तक्रार करु शकतात.  यासह तुम्ही पीडीएस सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) ने जारी केलेल्या टोल फ्री नंबर वर फोन करून तक्रार दाखल करा.   जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि रेशन दुकानदाराविषयी आपल्याला काही तक्रार करायची असेल तर महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी एक चांगली सुविधा करु दिली आहे.

 


आपण घरी बसून आपल्या रेशनकार्डविषयी माहिती जाणून घेण्यासाठी किंवा राज्यातील स्वस्त धान्य दुकानांची नावे ठिकाण जाणून घेण्यासाठी, तक्रार करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. जर आपली काही तक्रार असेल तर आपण ऑनलाईनने तक्रार करू शकता.  यासाठी आपल्याला mahafood.gov.in  या संकेतस्थळावर जावे लागेल.  या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला तक्रार निवारण पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यास एक नवीन पेज ओपन होईल. ते थे दिलेल्या क्रमा्ंकावर संपर्क करुन आपण तक्रार देऊ शकता.  तेथे आपम वितरण व्यवस्थेशीसंबंधीत तक्रार करु शकता. तक्रार निवारण केंद्र सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालू असते.   १९६७/१८००-२२-४९५० या नि:शुल्क टेलीफोन क्रमांकावर तक्रार नोंदविता येते.  सार्वजनिक वितरण व्यवस्था तक्रार निवारण केंद्रात helpline(dot)mhpds(at)gov(dot)in या ई-मेल द्वारेही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जर आपल्याला रेशन कार्ड मिळवण्यासाठी अडचणी येत असतील.  कोणी अधिकारी आपल्या अर्जाकडे दुर्लक्ष करत असेल तर आपण याची तक्रार थेट पंतप्रधान मोदींकडे करू शकतो.

अशा पद्धतीने करा तक्रार -

रेशन कार्डविषयी आपली काही तक्रार असेल तर आपण थेट पंतप्रधानांनाकडे तक्रार करू शकतात. पीएमओ इंडियाच्या संकेतस्तळावर जावे लागेल. https://pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ . या संकेतस्थळ उघडल्यानंतर आपल्याला Write to the Prime Minister चा पर्याय दिसेल.   त्यावर क्लिक करायची आहे. क्लिक केल्यानंतर एक नवा टॅब ओपन होईल.  त्यात एक अर्ज असेल. यात आपल्याविषयी काही माहिती मागितली जाते.  नाव आणि पत्ताशिवाय आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, कोणती तक्रार आहे, अशी माहिती आपल्याला भरावी लागणार आहे. माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.  अशाप्रकारे तुम्ही पंतप्रधान मोदींकडे तक्रार करु शकतात.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters