गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील पारा 40 वर पोहचला आहे. त्यामुळे वाढते ऊन आणि बाष्पीभवन (Evaporation) वाढल्याने जलस्त्रोतील पाण्याने तळ गाठला आहे. उन्हाळी पीके अंतिम टप्प्यात असतानाच पाणी टंचाई निर्माण झाली होती.
आतापर्यंत उपलब्ध पाणीसाठ्यावर उन्हाळी हंगामातील (Summer Crop) पिकांचा सिंचनाचा प्रश्न मिटला होता. बाष्पीभवन वाढल्याने जलस्त्रोतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पिकांसाठी रेणा प्रकल्पातून (Rena Project) पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे (Irrigation Department) केली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
Sharad Pawar meets PM Modi : शरद पवार मोदींच्या भेटीला; भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत की ED बाबत?
धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
पाटबंधारे विभागाचा धडाकेबाज निर्णय
पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील घणसरगाव, रेणापूर आणि खरोळा या बॅरेजेसमध्ये प्रकल्पातून पाणी सोडले आहे. त्यामुळे प्रकल्पालगतच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 140 हेक्टरावरील जमिन क्षेत्र हे सिंचनाखाली येणार असल्याने भर उन्हाळ्यात येथील शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे नुकसान तर टळले आहे पण आता उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लागलीच निर्णय झाल्याने शेतकरी सुखावला आहे.
गेल्या तीन वर्षापासून मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी आता शेतीसाठी देण्याचा निर्णय सर्वत्रच होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. यामुळे उत्पादनातही भर पडेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : कारखान्याच्या 2100 सभासदांचे सभासदत्व रद्द, वाचा नेमके काय घडले...
आनंदाची बातमी ! नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार देतंय 90 % अनुदान; असा करा अर्ज
Share your comments