कांदा जरी नगदी पीक असले तर त्यावर भरोसा ठेवणे म्हणजे कठीणच मग तो दर असो किंवा उत्पादन असो. बाजारात जेव्हा नवीन कांदा दाखल होतो त्यावेळी दर सुद्धा वाढलेले असतात. आता कुठे तरी दर स्थित होते तो पर्यंत मागील दोन दिवसात अहमदनगर मधील बाजारपेठेत कांद्याला फक्त ४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. कांदा पीक म्हणजे बेभरवशी पीक, जे की कधी ग्राहकांच्या डोळयातून पाणी काढते तर कधी कांदा उत्पादकांच्या.मागील काही दिवसांपूर्वी पाऊसामुळे खरीप हंगामातील कांदा बाजारात आला न्हवता त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा बाहेर विकायला काढला जे की आवक कमी झाल्याने कांद्याला त्यावेळी दर मिळाला. मात्र मागील दोन दिवसात अहमदनगर बाजारपेठेत कांद्याला फक्त ४ रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे.
कसे होणार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट:-
शेतीमालाच्या दरामध्ये असा चढ उतार राहिला तर २०२२ पर्यंत जे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे चालले होते ते स्वप्न अपूर्णच राहील. दिवसेंदिवस कांदा लागवडीसाठी लागणार खर्च वाढतच चालला आहे आणि दुसरीकडे कांद्याच्या दरात अशी घसरण. कांद्याच्या या अनियमित दरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे व व्यापारी वर्गाची चांदी.अगदी कांद्याच्या लागवडीपासून ते काढणी छाटणी तसेच विक्रीसाठी होणारा वाहतुकीचा खर्च हे सगळे सोडून कांदा विकणे म्हणजे तोटा च सहन करणे. अजून पाहायला गेले तर डिझेलचा खर्च, खत, कीटकनाशके, नांगरणीचा आणि मजुरांचा खर्च पाहता शेतकऱ्यानं कांदा कसलाच परवडत नाही. यामध्ये तर उत्पन्न दुप्पट करणे लांबच राहिले जे की शेतकऱ्याना तोटाच सहन करावा लागत आहे.
लासलगाव बाजार समितीमध्ये दर टिकून:-
आशिया मधील सर्वात मोठ्या बाजारपेठेत मागच्या दोन दिवसात कांद्याला ४५०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. कांद्याच्या अनुषंगाने सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते जे की महाराष्ट्र राज्यातील सुमारे ६० टक्के कांदा तिथे विक्रीसाठी दाखल होतो.देशातील कांद्याचा भाव निश्चित करण्याचे काम लालसगाव बाजारपेठ करते. जरी भाव निश्चित करत असली तर सरकारच्या धोरणाचा परिणाम या दरावर कायम झालेला आहे.
कांद्याला हमीभाव देण्याची मागणी:-
कांद्याच्या दरात कायमच चढ उतार राहतो जे की कधी पावसाने झालेले नुकसान तर कधी सरकारच्या धोरणामुळे झालेला कांद्यावर परिणाम त्यामुळे दुहेरी संकटात कांदा अडकलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी हे कळेना. नाफेडकडून कांद्याला प्रति किलो ३० रुपये भाव मिळावा अशी मागणी केली जात आहे असे कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिगोळे सांगतायत.
Share your comments