केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्वस्त धान्य वितरणाच्या बाबतीत रेशन दुकानांची भूमिका फार महत्त्वाचे असते. आपल्याला माहित आहेच की या दुकानांच्या माध्यमातूनच स्वस्त धान्याचा पुरवठा हा नागरिकांना केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातील देखील आर्थिक दुर्बल आणि गरीब घटकांसाठी स्वस्त धान्य दुकानांची भूमिकाही फार महत्त्वाची आहे.
अशाच महत्त्वाच्या असलेल्या या स्वस्त धान्य दुकानांच्या बाबतीत महत्वाची अपडेट समोर आले असून कोल्हापूर आणि पुण्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना देखील नवीन स्वस्त धान्य दुकान सुरू करण्याची एक सुवर्णसंधी चालून आली असून यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज देखील मागविण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना नवीन स्वस्त धान्य दुकान सुरू करण्याची सुवर्णसंधी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात नवीन स्वस्त धान्य दुकान सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाच्या 58 नवीन स्वस्त धान्य दुकानासाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून फक्त 58 जागांसाठी स्वस्त धान्य दुकानांसाठी अर्ज मागविले असून त्यासाठी पात्र संस्था अथवा बचत गटांना 28 फेब्रुवारी 2023 अंतिम दिनांक पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.
जर याबाबतीतला आपण जुलै 2017 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय आणि सात सप्टेंबर 2018 रोजी जारी केलेला शासन पत्रक त्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे विचार केला तर पंचायत ( ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना प्राधान्यक्रमानुसार नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर केले जाणार आहे.
विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकान व केरोसीन परवाने मंजूर करण्यात आलेल्या दुकानांचे सगळे जबाबदारी आणि व्यवस्थापन महिलांच्या द्वारे किंवा त्यांच्या समुदायाच्या माध्यमातून करणे बंधनकारक राहणार आहे.
या तालुक्यात मधून मागवण्यात आले आहेत अर्ज
प्रामुख्याने विचार केला तर अमरावती जिल्ह्यातील भातकुली, तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, चांदुर रेल्वे, नांदगाव ख आणि धारणी इत्यादी तालुके मिळून 58 गावांमध्ये या रिक्त स्वस्त धान्य दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Share your comments