सोमवारी जर्मन अॅग्रोकेमिकल्स प्रमुख बायरने एका मुलाखतीत सांगितले की त्यांनी सेमिनिस ब्रँडच्या अंतर्गत यलो गोल्ड 48 हे पहिले पिवळे कलिंगड(टरबूज) हा प्रकार भारतात सुरू केला आहे. बायरच्या जागतिक संशोधनातून आणि विकासाच्या प्रयत्नांतून हे पिवळे टरबूज एका जंतूनाशकपासून तयार केले गेले आहे असे या कंपनीने एका मुलाखतीत सांगितले आहे.
यावरती दोन वर्षांचा प्रयोग तसेच स्थानिक चाचण्या करून भारतामध्ये पिवळ्या रंगाचे टरबूज एका व्यावसायिक रित्या लाँच केले आहे यामध्ये यलो गोल्ड 48 टरबूज उत्पादकांना वाढीव क्षमता तसेच चांगले रोग आणि कीड पासून जास्तीत जास्त फायदा भेटेल असेही सांगितले आहे.पिवळे टरबूज हे फळ घेण्यासाठी ऑक्टोम्बर ते फेब्रुवारी हा कालावधी योग्य ठरेल तसेच एप्रिल नंतर तुम्ही याची कापणी होऊन जुलै च्या मध्यपर्यंत हे फळ बाजारामध्ये उपलब्ध राहील असे सांगितले आहे.
हेही वाचा:कृषी विद्यापीठांच्या शुल्काबाबत कृषिमंत्र्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
यलो गोल्ड 48 चे उच्च स्तरावर उत्पादन करून टरबूज उत्पादकांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये तसेच विदेशी फळांची मागणी करण्याकरिता हे सक्षम ठरेल. दक्षिण आशियातील बायर व्हेजिटेबल सिड्स चे प्रमुख के.मुथु यांनी असेही सांगितले की शेतकऱ्यांसाठी हे पिवळे टरबूज मोठ्या प्रमाणात उत्पादन देईल तसेच जे उत्पादक असतील त्यांचा संपर्क आम्ही स्टोअरशी करून देईल व बाजारात आणान्याचे साधन सुद्धा उपलब्ध करून देईल.
पिवळे टरबूज हे लाल टरबूज एवढे आकारणे असते जसे की त्याचा आकार त्याच्या वाढीवर अवलंबून असतो. पिवळ्या टरबुजचा रंग हा बाहेरुन मी सर्वसामान्य असतो पण आतमधून ते पिवळ्या रंगाचे असते त्याची चव सुद्धा अगदी मिठाई सारखी आहे जसे की वेगवेगळे फ्लेवर मध्ये ते असते.त्याचा आतील गाभा सुद्धा रसाळ आहे तसेच त्याची लागवड करणे सोपे आहे. अगदी पातळ प्रमाणात ते फळ आहे ज्याची कापणी सुद्धा अगदी हळुवारपणे करावी लागते. बायर सेमिनिस ब्रँड अंतर्गत भारतात पाच प्रकारातील टरबूज येणार आहेत.
Share your comments