1. बातम्या

कृषी विद्यापीठांच्या शुल्काबाबत कृषिमंत्र्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

KJ Maharashtra
KJ Maharashtra
fees concestion

fees concestion

 कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खाजगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मका मध्ये सवलत देण्याचा निर्णय कृषी मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केला आहे.

 या निर्णयाचा फायदा हा राज्यातील 38 शासकीय, 151 विनाअनुदानित अशा एकूण 189 महाविद्यालयातील जवळजवळ पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांना होणार आहे.

 तसेच च्या विद्यार्थ्यांचे आई-वडील आणि पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल व असे विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असतील तर अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्कात सूट देण्याचा निर्णय ही कृषिमंत्र्यांनी घेतला आहे.

 ज्या विद्यार्थ्यांची  फीस बाकी असेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.

 झालेल्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

राज्यातील अनुदानित महाविद्यालय व कृषी विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कामध्ये विद्यार्थी मदत निधी, विद्यार्थी सुरक्षा विमा शुल्क, महाविद्यालय नियतकालिक, अश्वमेध किंवा  क्रीडा महोत्सव शुल्क, नोंदणी शुल्क, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शुल्क, ओळखपत्र, विद्यार्थी कल्याण निधी, स्नेहसंमेलन, गुणपत्रिका शुल्क अशा बाबींवर कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यात आलेला नाही. त्यामुळे या बाबींसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

त्याबरोबरच लायब्ररी ची देखभाल आणि लायब्ररी मध्ये ई कन्टेन्ट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे या बाबींच्या शुल्कामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच कोरूना काळात वस्तीगृह वापर होत नसल्याने त्या शुल्कात शंभर टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.कायम विनाअनुदानित महाविद्यालयनी आकारण्यात येणारे विकास शुल्क यामध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे मागील शुल्क बाकी असेल अशा विद्यार्थ्यांना तीन ते चार हप्त्यांत भरण्याची मुभा देण्यात येणार आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters