चहा म्हटली म्हणजे शरीराला कितीही थकवा आलेला असला तरी त्यामधून चहा पिली असता कसा पटकन शरीरात तरतरीतपणा येतो. पावसाळ्यात दर पावसातून ओलाचिंब भिजून आल्यानंतर मस्त घरात बसून पडणाऱ्या पावसाचा आनंद लुटत चहाचा एक एक घोट घशात उतरवताना जो आनंद येतो दोन शब्दात वर्णन न करता येण्यासारखं आहे.
तसेच चौकातल्या किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या टपरीवर चहा घेत रंगलेल्या गप्पा मला तर एकात्मतेचे प्रतीक असल्यासारखे वाटते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्या भारतामध्ये पाण्यानंतर जर सर्वाधिक पिले जाणारे पेय असेल ते म्हणजे चहा. आज दिनांक 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने आपण या लेखाच्या माध्यमातून चहाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ईस्ट इंडिया कंपनीने केली चहा उत्पादनाची सुरुवात
जर आपण चहाचा विचार केला तर सोडावे दशकापर्यंत लोक चहाच्या पानांचा वापर हा भाजीसाठी करत होते किंवा त्याला वाटून काळ्या रंगाचा एक पेढे बनवून त्याचे सेवन करायचे. परंतु एकोणिसाव्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी तत्त्वावर चहाचे उत्पादन घेणे सुरू केले. जर ईस्ट इंडिया कंपनीने अगोदर भारतात व्यापाराची सुरुवात केली असेल तर ति चहा पासून केली. ईस्ट इंडिया कंपनीने पहिल्या चहाची बाग आसाम मध्ये सुरू केली. जर आजचा विचार केला तर देशातील बऱ्याच भागांमध्ये चहाची शेती केली जाते.
भारतातील चहाचे लोकप्रिय प्रकार
-
कांगडा टी – हिमाचल प्रदेश मधील कांगडा भागावरून या प्रकाराला कांगडा टी असे म्हटले जाते. हिमाचलमधील हा भाग चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागामध्ये साधारण हिरवा आणि काळा रंगाची चहाचे उत्पादन घेतले जाते. या परिसरामध्ये 1829 पासून चहाचे उत्पादन घेतले जाते. कांगडा टी हा चहाचा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे.
-
दार्जिलिंग टी – भारतामध्ये दार्जिलिंग चहा अतिशय लोकप्रिय आहे. या भागामध्ये सन 1841 पासून चिनी चहाच्या रोपांची लागवड केली जाते. या प्रकाराच्या चहाच्या वेगळ्या चवीमुळे दार्जिलिंग चहा ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असते. तसेच दार्जिलिंग मध्ये उगवणाऱ्या चहाला संपूर्ण जगभरातून फार मागणी आहे.
-
आसाम टी – आसाम राज्य आहे भारतामध्ये चहाच्या उत्पादनात अग्रेसर आहे. या राज्यात पिकणारी चहा ही आसाम टी या नावाने ओळखले जाते. आसाम मध्ये चहा चे सगळ्यात मोठे संशोधन केंद्र आहे. ब्रिटिशांनी चहाला या राज्यातूनच ओळख मिळवून दिली होती.
हेही वाचा : जागतिक मधमाशी दिवस: आजच्या दिवशी जाणून घ्या मधमाशींच्या प्रजातीची नावे
भारतातील चहा उत्पादक प्रमुख भाग
जर भारताचा विचार केला तर आसाम, दार्जीलिंग, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ इत्यादी राज्यात चहाच्या बागा आहेत याठिकाणी सगळीकडे उत्तम दर्जाच्या चहा तयार होतो. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, आसाम मध्ये एकूण 43 हजार 292 पेक्षा जास्त चहाच्या बागा आहेत. दार्जिलिंग मध्ये 85 पेक्षा जास्त चहाच्या भाग आहेत तर निलगिरी मध्ये 62 हजार 213 पेक्षा जास्त चहाच्या बागा आहेत.
बेरोजगारांसाठी चहा विक्री एक फायदेशीर व्यवसाय
हा व्यवसाय फायदेशीर आहे याचे कारण च्या हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय पेय आहे. तसेच या व्यवसायाची लोकप्रियता फार वेगाने वाढत आहे. जर भारताचा विचार केला तर भारतात प्रत्येक वेळ ही चहाची वेळ असते. सकाळी चहा नाही घेतला तर त्याशिवाय सकाळची वेळ ही अपूर्ण वाटते. एक भारतीय प्रौढ व्यक्ती सरासरी दररोज कमीत कमी दोन कप चहा पितो. चहा किंवा कॉफी चा एक लहानसा स्टॉल उघडणे हा एक फायदेशीर आणि आत्मविश्वासपूर्ण व्यवसाय आहे.
आपल्या स्वतःची गुंतवणुकीची क्षमता पाहून आपण चहाचा स्टोर चा स्थापना करू शकता तसेच आपण छोटा स्टोअरच्या माध्यमातून हळूहळू फ्रेंचायसी व्यवसाय करण्याचा देखील विचार करू शकता. हा व्यवसाय तुम्ही मोठी शहरे च अगदी छोटे शहर तसेच गावांमध्ये सुरू करू शकतो. जरी या व्यवसायाला कठोर परिश्रम, जिद्द, मेहनत तसेच थेट ग्राहक संवाद आणि दीर्घ काळाचा अवधी दिला तर या व्यवसायात कमी गुंतवणुकीत चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
Share your comments