दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठीच्या खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट

16 May 2020 02:25 PM By: KJ Maharashtra


नवी दिल्ली:
कोविड-19 चा दुग्धव्यवसाय क्षेत्रावर होणारा आर्थिक परिणाम दूर करण्यासाठी मत्स्योत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने वर्ष 2020-21 दरम्यान दुग्धव्यवसाय उपक्रम राबविणाऱ्या दुग्ध सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संस्था (एसडीसी आणि एफपीओ) सहाय्य प्रदान करण्यासाठी “दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी खेळत्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट” ही योजना सुरु केली आहे.

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी आणि कमी विक्रीमुळे दुध/दुग्ध सहकारी संस्थांनी दीर्घकालीन टिकाऊ अशा दुधाची भुकटीलोणीतूप आणि युएचटी दुध इत्यादीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. या उत्पादनांच्या निर्मितीमुळे निधीचा प्रवाह कमी झाला आणि शेतकऱ्यांना पैसे देणे अवघड झाले. आईस्क्रीमसुगंधी दुधतूपचीज इत्यादी उच्च किंमत असणाऱ्या उत्पादनांची मागणी कमी झाल्यामुळे खूप कमी प्रमाणात दुधापसून पनीर आणि दही असे उच्च मूल्य असणारे उत्पादन तयार करण्यात येत असल्यामुळे विक्री आणि आर्थिक उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम असा होईल की सहकारी पातळीवर सद्यस्थितीत दूध खरेदी करण्याची क्षमता कमी होईल किंवा त्यांना कमी किंमतीत दुध खरेदी करावे लागेलज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होईल.

सहकारी आणि शेतकरी मालकीच्या दूध उत्पादक कंपन्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत अनुसूचित वाणिज्य बँक/आर.आर.बी/सहकारी बँका/वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या भांडवली कर्जावरील व्याजात सूट दिली जाईल. सहकारी/एफपीओ द्वारे संरक्षित वस्तू व इतर दूध उत्पादनांमध्ये दुधाचे रूपांतर करण्यासाठी ही सुविधा देण्यात येईल.

या योजनेंतर्गत दरवर्षी दोन टक्के दराने व्याज सूट देण्याची तरतूद आहे. व्याजाची त्वरित व वेळेवर परतफेड केल्यास व्याजात दोन टक्के अतिरिक्त सूट देण्याचीही तरतूद आहे. हे अतिरिक्त दूध वापरासाठी कार्यरत खेळत्या भांडवलाचे संकट कमी करण्यास आणि शेतकऱ्यांना वेळेवर देय देण्यास मदत करेल. या विभागामार्फत ही योजना राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी)आनंद यांच्यामार्फत राबविली जाईल.

सुधारित योजनेत 2020-21 दरम्यान "दुग्ध क्षेत्रासाठी कार्यरत खेळत्या भांडवलाच्या कर्जावरील व्याजात सूट" देण्यासाठी 100 कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची तरतूद करण्यात आहे. योजनेचे खालील फायदे आहेत

  • दुध उत्पादकांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल.
  • उत्पादक मालकीच्या संस्था दुध उत्पादकांना त्याच्या दुधाच्या बिलाचे पैसे वेळेवर देण्यास सक्षम होतील.
  • हे उत्पादकांच्या मालकीच्या संस्थांना ग्राहकांना वाजवी दराने दर्जेदार दूध व दुधाचे पदार्थ पुरवण्यात मदत करेल आणि संरक्षित दुग्ध वस्तू व इतर दूध उत्पादनांच्या देशांतर्गत बाजारभाव स्थिर करण्यास मदत करेल.
  • दुध उत्पादकांना दुग्धव्यवसाय फायदेशीर करण्यासोबतच दुधवाढीच्या काळात दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांच्या उत्पनात सातत्याने वाढ होते. यामुळे टंचाईच्या काळात आयातित वस्तूंवरील अवलंबन कमी होईल आणि त्यामुळे दूध व दुधाच्या उत्पादनांच्या देशांतर्गत किंमती स्थिर राहतील.

कोविड-19 मुळेमोठ्या संख्येने लहान खासगी डेअरींचे संचालन बंद केल्यामुळे परिणामी सहकारी संस्थांना अतिरिक्त दूध मिळत आहे. ही छोटी खाजगी दुग्धालये प्रामुख्याने दुधाची मिठाई आणि शहरांमध्ये दुध वितरणाचे काम करायचे. कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांमुळे खासगी तसेच सहकारी संस्थांकडून हॉटेल आणि उपहारगृहांच्या दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कंत्राटी कामगारांची कमतरतावितरण केंद्र बंद होणेपॅकेजिंग साहित्य मिळवण्यास अडचणी इत्यादी समस्या तसेच वितरकवाहतूकदार आणि कर्मचारी यांच्यासमोरील पुरवठा आव्हान यासारख्या अडचणींमुळे बहुतेक खासगी दुग्धशाळांनी एकतर त्यांचा पुरवठा मर्यादित केला आहे किंवा त्यांची दुकाने बंद केली आहेत.

तथापि सहकारी संस्थांनी जाहीर केलेल्या खरेदी दराने खरेदी सुरू ठेवली आहे आणि काही सहकारी संस्थांनी त्यांच्या खरेदी किंमतीत वाढ केली आहे. सहकारी संस्थांकडून जानेवारी 2020 मध्ये टोन्ड दुधाची (टीएम) आणि पूर्ण क्रीम दुधाची (एफसीएम) किंमत अनुक्रमे जानेवारी 2020 मध्ये 42.56 रुपये आणि 53.80 रुपये प्रती लीटर होती आणि 8 एप्रिल 2020 रोजी ती अनुक्रमे. 43.50 रुपये आणि 54.93 रुपये प्रती लिटर होती.

मार्च 2019 मध्ये प्रमुख सहकारी संस्थांकडून दररोज 510 लाख लिटर (एलएलपीडी) दूध खरेदी करण्यात आले आणि 14 एप्रिल 2020 रोजी टंचाईचा हंगाम सुरू झाला तरीही सुमारे 560 एलएलपीडी दुधाची खरेदी झाली. गेल्या एका वर्षात 8% वाढ झाली आहे. हंगाम आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मागणीचा दुधाच्या खरेदीवर परिणाम होत असला तरी देशांतर्गत बाजारात दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात स्थिर राहिली आहे. भारतात सहकारी संस्थांकडून होणारी दूध विक्री फेब्रुवारी 2020 मधील 360 एलएलपीडी वरून 14 एप्रिल 2020 रोजी 340 एलएलपीडीपर्यंत घसरली आहे. अशा प्रकारेदुधाच्या खरेदीत 8 टक्क्यांनी वाढ झालीपरंतु विक्रीत 6 टक्क्यांनी घट झाली. दररोज खरेदी आणि विक्री दरम्यानची तफावत अंदाजे 200 एलएलपीडी आहे.

milk dairy sector Interest subvention for the dairy sector दुग्ध सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था farmers producer organisation milk cooperatives दुग्धव्यवसाय दुध कोविड-19 covid 19 लॉकडाऊन lockdown
English Summary: Interest subvention on working capital loans for the dairy sector

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.