धानाच्या तात्काळ परताव्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश

02 January 2020 02:56 PM


मुंबई:
विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान हे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात यावे. धान खरेदीनंतर तात्काळ त्याचा परतावा मिळावा यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना असून, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विधानभवनात शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विक्रेंद्रित खरेदी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. पटोले बोलत होते.

श्री. पटोले म्हणाले, शासनाच्या योजना या शेतकऱ्यांसाठी असून, त्यांना न्याय मिळावा या पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. किमान आधारभूत किंमत केंद्रावरील शेतकऱ्यांचे धान पावसाने खराब होऊ नये यासाठी जलद गतीने खरेदी करावे. धान खरेदीनंतर सात दिवसामध्ये शेतकऱ्यांना त्याचा परतावा देण्यात यावा. उपलब्ध ॲपमध्ये सुधारणा करून, शेतकऱ्यांना यासंदर्भात सूचना देण्यात यावी. भविष्यात धान साठून राहू नये आणि शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो परतावा मिळावा आणि धान खराब होऊ नये, यासाठी वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी आणि संबंधित संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा आणावी, असेही श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

यावेळी बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

dhan Paddy nana patole गोंदिया भंडारा नाना पटोले धान तांदूळ gondia Bhandara
English Summary: Instructions on using the technology for immediate refund of paddy procurement

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.