सध्या शेतकरी बंधू (Farmers) पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक पद्धतीचा देखील अवलंब करत आहेत. तसेच शेती सोबत अनेक जोडव्यवसायांना प्राधान्य देत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम (Farming) राबवताना दिसत आहेत. आता शेतकरीसुद्धा काळाबरोबर आपल्या शेती पद्धतीत बदल करून बक्कळ कमाई करत आहेत. असाच एक उपक्रम बारामती तालुक्यातील एका शेतकऱ्याने राबवला आहे.
बारामतीचे शेतकरी पांडुरंग तावरे 'कृषी-फळबागा पर्यटन' हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. शेतकरी पांडुरंग तावरे यांच्या 'ऍग्री टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' या स्टार्टअपने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. शिवाय या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी बंधूना स्वावलंबी बनवणे. शेतकरी पांडुरंग तावरे यांच्या उपक्रमामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
हा उपक्रम सुरु करताना नामाकिंत कंपनीने गुंतवणूक करून पाठबळ देखील दिले आहे. यात प्रामुख्याने हाउ-टेक सॉइल-बेस्ड वर्टिकल फार्मसाठी देशभर नावाजलेल्या आणि हळद उत्पादनातील एका सर्वात मोठय़ा 'ए एस एग्री एंड एक्वा एलएलबी' या कंपन्यांचा समावेश आहे. शेतकरी पांडुरंग यांच्या या उपक्रमातून देशातील 'ऍग्री इको-हॉर्टी टुरिझम' म्हणजेच कृषी-फळबागा पर्यटनाला चालना मिळाली आहे. त्यामुळे निश्तिच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारे कार्य आहे.
कृषी-फळबागा पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना आहे. कृषी-फळबागा पर्यटनामुळे नवीन अर्थार्जनाच्या संधी निर्माण होतील. तसेच गावांचा शाश्वत विकासही यातून होईल. कृषी पर्यटन क्षेत्रातील धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती मिळते तसेच शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन आणि ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभव त्यांना घेता येतो.
बापरे! रानडुकराचा जीवघेणा हल्ला; 62 वर्षीय शेतकऱ्याने दिली टक्करची लढाई
तसेच शेतीची कामे कशी चालतात त्याचा स्वतः अनुभव घेऊन निसर्गाशी मैत्री करण्याचीही संधी मिळते. निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा देखील मिळते.
आजकाल तरुण वर्ग शेती करण्याकडे वळला आहे. नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतीतील उत्पादन वाढवण्यास तरुण शेतकरी मदत करत आहेत. उच्च शिक्षण घेतल्यानंतर युवा वर्ग परदेशात जाण्याचं स्वप्न बघत असतो. मात्र आता असे कितीतरी उच्चशिक्षित तरुण आपल्या जिद्दीच्या, ज्ञानाच्या जोरावर शेती क्षेत्रात अफाट यश मिळवताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
राज्य सरकारची मोठी घोषणा; 'या' वन्य प्राण्यामुळे शेतातील मालमत्तेचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
संकटांची मालिका सुरूच; भाव नसल्याने शेतकऱ्याने मेथीवर फिरवला रोटर
Share your comments