1. बातम्या

मराठवाड्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

KJ Staff
KJ Staff


परभणी:
मराठवाडा विभागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत असुन सद्या हवामान ढगाळ असल्याणे व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे उपाय योजना करण्‍याचे आवाहन करण्यात येत आहे. 

सदयस्थितीत करावयाच्‍या उपाय योजना:

  • कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे.
  • गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी पाच प्रमाणे लावावीत, तसेच सापळ्यात सतत 2 ते 3 दिवस प्रति सापळा सरासरी 8 ते 10 पतंग आढळल्यास हि आर्थिक नुकसानीची पातळी समजावी.
  • गुलाबी बोंडअळीचे पतंग कामगंध सापळयात अढळल्यास त्वरीत अझाडिरॅक्टीन 1,500 पीपीएम 40-50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • उपलब्धतेप्रमाणे कपाशीत एकरी 3 ट्रायकोकार्ड पानाच्या खालच्या बाजूस लावावेत.

फवारणीसाठी किटकनाशके:

किडींचा प्रादुर्भाव

किटकनाशके

प्रति दहा लिटर पाण्‍यात वापराचे प्रमाण

5 टक्के

अझाडिरॅक्टीन 0.15 टक्के

50 मिली

अझाडिरॅक्टीन 0.30 टक्के

40 मिली

क्विनॉलफॉस 25 ए एफ. किंवा

20 मिली

प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा

20 मिली

क्लोरोपायरीफॉस 20 ईसी

25 मिली

5-10 टक्के

थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा

20 ग्रॅम

इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एस जी

04 ग्रॅम

10 टक्के पेक्षा जास्त

थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी

04 मिली

प्रोफेनोफॉस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के

20 मिली

 

वरील किटकनाशकाचे प्रमाण हे साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. गुलाबी बोंडअळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. आर. झंवर शास्त्रज्ञ डॉ. ए. जी. बडगुजर आणि डॉ. के. जी. अंभुरे यांनी केले आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters