राज्यात रब्बी हंगामातील पिके जोमात वाढत आहेत. रब्बी हंगामातील एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाणारे हरभरा पीक देखील जोमाने वाढत आहे, सध्या हरभरा पीक हे फळधारणा अवस्थेत असून आता हरभरा पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव नजरेस पडत आहे. रब्बी हंगामातील या महत्त्वाच्या पिकाची विशेष काळजी घेतली गेली नाही तर यामुळे हजारोंचे नुकसान होण्याचा धोका कायम असतो. हरभरा पिकावर सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे त्या अनुषंगाने राज्यातील कृषी विभागाने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कृषी तज्ञांच्या या सूचनांचे पालन करून हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या घाटे अळीचे व्यवस्थापन केले जाऊ शकते.
या रब्बी हंगामात नेहमीपेक्षा हरभरा पिकाची अधिक पेरणी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील या महत्त्वाच्या पिकावर सर्वात जास्त धोका हा घाटेअळीचा असतो, आणि सध्या राज्यात सर्वत्र हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहे. हरभरा पिकावर घाटे अळी फुलोरा अवस्थेत आढळते. फुलोरा अवस्थेत असताना हरभरा पिकावर या अळीचे पतंग पिकाच्या अगदी शेंड्यावर अंडी घालत असतात. अंड्यातुन बाहेर पडलेली अळी पिकाचे पानांवरील हरितद्रव्य शोषून घेते त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते परिणामी, संक्रमित पानांची गळ होते. हरभरा पूर्णता फुलोऱ्यावर आल्यावर मादी पतंग फुलांवर तसेच नव्याने आलेल्या घाट्यांवर अंडी घालते. अंड्यातून बाहेर आल्यानंतर ही अळी पाने फुले आणि घाटे पोखरते. कृषी तज्ञांची मते, एकेकाळी साधारणत चाळीस घाटे नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवत असते. त्यामुळे या घाटे आळीवर वेळीच नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे असते नाहीतर यामुळे हजारो रुपयांचे नुकसान हे अटल आहे.
घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना:- हरभरा पेरणी करताना पूर्व मशागत व्यवस्थितरीत्या झाली असली तर घाटेअळीचा प्रादुर्भाव एवढा जाणवत नाही. जमिनीची खोल नांगरणी करावी यामुळे घाटे अळीचे पतंग बाहेर पडत नाहीत. पेरणी करताना विशेष काळजी घ्यावी, हरभऱ्याची पेरणी जास्त दाट होता कामा नये, पेरणी योग्य अंतरावरच केली गेली पाहिजे. घाटेअळीसाठी सर्वात उत्तम प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे हरभरा पिकात गहू, मसूर, मोहरी, बार्ली अथवा जवस अशी आंतरपिके घेतली गेली पाहिजे यामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव हा जवळपास नगण्य होऊन जातो.
तसेच घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास हेक्टरी 20 पक्षी थांबे बसवण्याची शिफारस केली जाते, तसेच हेक्टरी तीन चार फेरोमन सापळे लावण्याची शिफारस केली जाते. आपण घाटे अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा देखील प्रभावी वापर करू शकता.
टीप:- कुठल्याही किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा अवश्य सल्ला घ्यावा.
Share your comments