चोरी झाली असेल, कुटुंबातील वाद असतील अशा एक ना अनेक तक्रारी आपण आजपर्यंत ऐकल्या असतील. त्यांची कायदेशीररित्या नोंद करून त्यावर कारवाईही केली जाते. मात्र सध्या एक इसमाने अशी काही तक्रार केली आहे की, सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की, शिक्षा कोणाला आणि कशी करावी. पाऊस कमी पडत असल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये गजबच प्रकार घडला आहे.
पुरेसा पाऊस पडत नसल्याने उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील एका व्यक्तीने चक्क इंद्रदेवाविरोधातच तक्रार केली आहे. विशेष म्हणजे कर्नेलगंजच्या तहसीलदारांनीही हा तक्रार अर्ज कारवाईसाठी पुढे पाठवला. त्यामुळे सोशल मीडियावर या तक्रारीची बरीच चर्चा रंगली आहे. कौडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या 'झाला' गावातील सुमित यादव या व्यक्तीने इंद्रदेवाच्या विरोधात तक्रार केली आहे.
पाऊस खूप कमी होतोय त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होत. त्यांच्या पिकांवर मोठा परिणाम होतोय शिवाय घरात राहणाऱ्या महिला आणि मुलांचेही बरेच हाल होत आहेत त्यामुळे इंद्रदेवाविरुद्ध तातडीने कारवाई करावी ही विनंती. असे तक्रार अर्जात नमूद केले आहे.
आश्चर्य म्हणजे कर्नेलगंजच्या तहसीलदारांनीही हे पत्र स्वाक्षरी करून कारवाईसाठी पुढे जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले. नंतर हे पत्र सोशल मीडियावर बरेच वायरल झाले. मात्र जिल्हा दंडाधिकारी डॉ. उज्ज्वल कुमार यांनी याची गांभीर्याने दखल घेत पत्र न वाचताच पुढे कसे दिले, असा सवाल उपस्थित केला आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलात ३० रुपयाची मोठी कपात
त्यामुळे अधिकारी लोकं न वाचताच तक्रारी पुढे ढकलतात का? असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र तक्रारकर्त्याचं हे पत्र सोशल मीडियावर चांगलच वायरल झालं आहे. आता प्रशासकीय अधिकारी इंद्रदेवाला कशी शिक्षा करणार? तक्रारकर्त्याचा प्रश्न कसा मार्गी लागणार यावरून सोशल मीडियावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या
आता शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार!
आता महाग होऊ शकतो वरण-भात! डाळ आणि तुरीचे लागवड क्षेत्रात घट,वाचा सविस्तर माहिती
Share your comments