शेतकऱ्यांचा देशी जुगाड ; दुचाकीच्या मदतीने काढले मक्याचे दाणे

01 September 2020 07:07 PM


गरज ही शोधाची जननी आहे, हे म्हणणे येथे चूक ठरणार नाही. शेतकरी हा या ग्रहातील सर्वात हुशार जीव  आहे. शेती करणे म्हणजे इतके सोप्पे काम नाही शेतीसाठी अनेक घटकांवर अवलंबून रहावे लागते.   निसर्ग, हवामान, पाऊस इतके होऊन सुद्धा शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळत नाही. शेतकऱ्याची  जीवनशैली  अतिशय कठीण अशा घटकांना त्याला सामोरे जावे लागते असते. ज्यासाठी कठोरपणा आणि कोणत्याही चिकट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सुधारण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये असणे आवश्यक असते.

शेतकरी हा भारतीय समाजाचा आधार आहे. तसेच, हा एक संवेदनशील विषय आहे ज्यास काळजीपूर्वक हाताळण्याची आवश्यकता आहे. भारतातील लोक विविध व्यवसायात गुंतले आहेत, परंतु शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय आहे. याउलट, जरी ते अर्थव्यवस्थेचा कणा आहेत तरीही त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्याचा केवळ त्यांनाच नव्हे तर इतर लोकांवरही परिणाम होतो.

कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर अधिक होत आहे. पण सर्वच शेतकरी यंत्राचा वापर करु शकत नाहीत. परंतु आपल्याकडील अल्प साधनातही बळीराजा आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर श्रम कमी करुन कामे जलदगतीने पूर्ण करत असतात. ही सर्व साधने देशी जुगाडची असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल  मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील शेतकरी बांधव मोटरसायकलच्या मदतीने मक्याची दाणे वेगळे करत आहेत. 

यामुळे त्यांच्या वेळेची बचत होऊन मजुरांचा खर्चही कमी झाला. दरम्यान याचा व्हिडिओ महिंद्रा अँण्ड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी हा जुगाडचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.  मका उत्पादकांनी मका कापपणीनंतर मक्याचे दाणे काढण्यासाठी मोटारसायकलचा उपयोग केला. मोटरसायल उभी करुन ती चालू केली मोटारच्या गतीने मागील चाक फिरु लागले.  त्या फिरत्या चाकाच्या एका बाजुला मक्याचे कणीस लावून मक्याचे दाणे काढली. शेतकऱ्यांचा हा जुगाड पाहून प्रशासनाने त्यांना यंत्राचे प्रशिक्षण दिल्यास शेतकरी नक्कीच त्याचे सोने करतील यात शंका नाही.

indigenous farmers corn kernel देशी जुगाड मका आनंदा महिंद्रा Anand Mahindra
English Summary: Indigenous struggle of farmers; Removed corn kernel with the help of a bike

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.