1. बातम्या

भारताचा आंबा आता निघाला अमेरिका वारीवर, निर्यातीचा मार्ग झाला मोकळा..

सध्या भारतात आंब्याचा सीजन सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे याला मोठा फटका बसला आहे. यामुळे सध्या आंब्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. असे असताना आता भारतातील आंबा हा अमेरिकेच्या वारीवर निघाला आहे. यामुळे आता तेथील नागरिक देखील या आंब्याची चव घेणार आहेत. भारतीय आंब्याच्या निर्यातीसाठी अमेरिकेच्या कृषी विभागाची मान्यता मिळवली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
mango

mango

सध्या भारतात आंब्याचा सीजन सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे याला मोठा फटका बसला आहे. यामुळे सध्या आंब्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. असे असताना आता भारतातील आंबा हा अमेरिकेच्या वारीवर निघाला आहे. यामुळे आता तेथील नागरिक देखील या आंब्याची चव घेणार आहेत. भारतीय आंब्याच्या निर्यातीसाठी अमेरिकेच्या कृषी विभागाची मान्यता मिळवली आहे. यामुळे यंदा आंब्याचे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे याबाबत निर्णय होत नव्हता. अखेर आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतातील आंब्याला अमेरिकेमध्ये मोठी मागणी आहे. कृषी व शेतकरी कल्याण विभाग आणि अमेरिकेच्या कृषी विभागाने एका संयुक्त करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात भारतीय आंबा आणि डाळिंबाची निर्यात आणि अमेरिकन चेरी व अल्फाल्फा गवत आयात विक्रीविषयक प्रोटोकॉलचे पालन करतील. यामुळे या दोन देशांमधील व्यापार देखील यामुळे वाढणार आहे. याचा फायदा दोन्ही देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. मार्चपासून हापूस आंब्यासह इतर आंब्यांची अमेरिकेला निर्यात सुरु होईल.

याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. भारतीय आंब्याच्या निर्यातीवर २०२० पासून अमेरिकेने निर्यातीवर निर्बंध घातले होते. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे यामध्ये अडचणी येत होत्या. यामुळे यावर्षी तरी याबाबत निर्णय होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. यामुळे आता चांगल्या प्रतीच्या फळांना आता चांगला दर मिळणार आहे. यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी ही निर्यात बंद असताना मोठे नुकसान सोसले आहे. यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणावर आंबा उत्पादक शेतकरी आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणावर फळधारणा झाली होती. मात्र अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर मोहोर गळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्त प्रमाणावर औषधे मारावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागला. यामुळे आता उत्पन्न देखील चांगले मिळावे अशी शेतकऱ्यांची आशा आहे. आता निर्यात सुरु झाल्याने तशी शक्यता वाढली आहे.

English Summary: India's mango has now gone to the US, the way for export has been cleared .. Published on: 15 January 2022, 09:55 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters