1. कृषीपीडिया

पिकांच्या उत्पन्नासाठी तसेच जमिनीच्या आरोग्यासाठी ठरतेय ह्युमिक ऍसिड फायदेशीर, या प्रकारे घरी बनवू शकता तुम्ही ह्युमिक ऍसिड

शेतकरी आपल्या शेतीमधील उत्पन्न वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करत आहेत, मात्र ही रासायनिक खते व कीटकनाशके पिकांसाठी तसेच जमिनीच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत हे शेतकऱ्यांना माहीत नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांना हे समजले आहे ते शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळली आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये एक घटक वापरायचा असतो तो घटक म्हणजे ह्युमिक ऍसिड. आज आपण ह्युमिक ऍसिड घरी कसे बनवता येईल ते पाहणार आहोत.

किरण भेकणे
किरण भेकणे
Humic acid

Humic acid

शेतकरी आपल्या शेतीमधील उत्पन्न वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर  करत  आहेत, मात्र  ही  रासायनिक  खते  व  कीटकनाशके पिकांसाठी  तसेच  जमिनीच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत हे शेतकऱ्यांना माहीत नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांना हे समजले आहे ते शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळली आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये एक घटक वापरायचा असतो तो घटक म्हणजे ह्युमिक ऍसिड. आज आपण ह्युमिक ऍसिड घरी कसे बनवता येईल ते पाहणार आहोत.

ह्युमिक ऍसिड म्हणजे काय?

ह्युमिक ऍसिड म्हणजे जे जनावरांचे विष्ठा तसेच मलमूत्र, पालापाचोळा आणि शेतीमधील काडीकचरा कुजून यांचे विघटन होते या विघटनास ह्युमस असे म्हणतात. मात्र बाजारात पाहायला गेले तर वेगळेच प्रकारचे ह्युमिक ऍसिड भेटते, जे की पोटॅशियम हुमेट या स्वरूपामध्ये असते. कॉस्टिक पोटॅश ची प्रक्रिया करून हे  ह्युमिक  ऍसिड  बनवले जाते.  मात्र  आपण  सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी ह्युमिक ऍसिड तयार करू शकतो.

घरच्या घरी ह्युमिक ॲसिड कसे बनवायचे? ( एक एकर साठी )

साहित्य – जुन्या गोवऱ्या,गूळ दोन किलो, दीड ते दोन किलो दही, 100 लिटर पाणी

कृती :-

प्रथमता तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा ड्रममध्ये पाणी घ्या नंतर त्या पाण्यामध्ये तुम्ही गोवऱ्या टाकाव्यात. १०० लिटर पाण्यात गूळ टाकावा. हे सर्व मिश्रण तुम्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. झालेल्या मिश्रणात तुम्ही दही टाकावे. तयार झालेले मिश्रण जवळपास ५ ते ६ दिवस चांगले झाकून ठेवावे. मात्र त्या दिवसात रोज रात्री मिश्रण धवळायला आजिबात विसरू नये. ६ दिवस झाले की सातव्या दिवशी हे १०० लिटर पाण्याचे मिश्रण २०० लिटर च्या भांड्यात टाकावे जे की त्यामध्ये अजून १०० लिटर पाणी मिक्स करावे. हे तयार झालेले मिश्रण चांगल्या प्रकारे गाळून घेऊन ड्रीपद्वारे एक एकरातील पिकांना द्यावे. तुम्ही हे मिश्रण जास्तीत जास्त ८ ते १० दिवस वापरू शकता. तयार झाले की जेवढ्या लवकर तुम्हाला ते मिश्रण वापरता येईल तेवढ्या लवकर वापरा. फळबाग असो किंवा भाजीपाला पिके असो या सर्वांसाठी तुम्ही हे मिश्रण वापरू शकता.

पिकांना ह्युमिक ऍसिड चे फायदे :-

१. ह्युमिक ऍसिडमुळे पांढऱ्या मुळांची जलद वाढ होते.
२. ह्युमिक ऍसिडमुळे मातीचे आरोग्य देखील चांगले राहते तसेच जमिनीची धूप थांबवण्याचे काम ह्युमिक ऍसिड करते.
३. मातीमध्ये पाणी साठवण्याची क्षमता ह्युमिक ऍसिडमुळे वाढते. जे की दुष्काळात याचा फायदा होतो.
४. ह्युमिक ऍसिड वापरल्याने शेतातील माती रंग गडद होतो जे की सूर्याची ऊर्जा शोषन करण्यास मदत होते.
५. क्षारयुक्त तसेच आमलयुक्त मातीचा सामू स्थिर ठेवण्याचे काम ह्युमिक ऍसिड करते.
६. मातीमध्ये अन्नद्रव्य तसेच पाणी शोषून घेण्याचे काम ह्युमिक ऍसिड करते.
७. ह्युमिक ऍसिड पिकांच्या मध्ये अशी क्षमता वाढते ज्याने रोग व किडीचा विरोधात पिके लढतात.
८. वनस्पती मधील जीवनसत्त्वे तसेच खनिजे आढळतात.
९. ह्युमिक ऍसिडमुळे बियाणांची उगवण क्षमता देखील वाढते.

English Summary: Humic acid is beneficial for crop yields as well as soil health, this is how you can make humic acid at home. Published on: 14 April 2022, 12:38 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters