MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

Wheat Export:भारताने गव्हाचे निर्यात थांबवली कारण की…….

सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली असून त्यामागे काय कारणे आहेत याचाही शोध घेणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध कारणे सांगता येतील. परंतु दोन कारणेही महत्त्वाचे आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
indian goverment ban on  export to wheat grain due to some important reason behind desion

indian goverment ban on export to wheat grain due to some important reason behind desion

 सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली असून त्यामागे काय कारणे आहेत याचाही शोध घेणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध कारणे सांगता येतील. परंतु दोन कारणेही महत्त्वाचे आहेत.

त्यामध्ये पहिले कारण म्हणजे हवामान बदलाचा गहू पिकावर विपरीत परिणाम होऊन गव्हाचे उत्पादनात घट झाली  आणि दुसरे कारण म्हणजे गव्हाची सरकारी खरेदी कमी झाली ही कारणे सांगता येतील. यामध्ये आता फक्त ज्या कंपन्यांना 13 मे पर्यंत एलओसी मिळाले आहे त्याच कंपन्या गव्हाची निर्यात करू शकतील. या बाबतीत सरकारने जो काही अध्यादेश काढला त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, अनेक कारणांमुळे जगात गव्हाच्या किमतीमध्ये वाढ झाली त्यामुळेभारतासह शेजारीदेशांच्या खाद्य सुरक्षा संकट निर्माण झाले आहे हे लक्षात घेऊनचभारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल मागच्या महिन्याच्या पंधरा तारखेला म्हणाले होते की 2022-23 या वर्षी गहू निर्यात 100 लाख टनांच्या पुढे जाईल. परंतु अचानक सरकारने युटर्न घेतल्याने शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. आणि या शेतकरी संघटनांच्या मते या निर्णयाने गव्हाचे दर घसरून त्यांचे नुकसान होईल. तर काही संघटनांच्या मते यामुळे सामान्यांना योग्य किमतीत मिळेल यामुळे निर्यात बंदीचा निर्णय योग्य आहे असे म्हणणे आहे.

 या निर्णयामागील अजून काही कारणे

सरकारी खरेदीतून मे महिन्याच्या सुरुवातीला साठा सात वर्षाच्या सर्वात कमी स्तरावर पोहोचला. गेल्या वर्षाचा विचार केला तर 57 टक्के साठा हा कमी झाला आहे. तसेच वर्षभरात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून 434 लाख मेट्रीक टन गहू वाटला जात आहे.आता पंतप्रधान गरीब कल्याण योजना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे ती एप्रिल 2023 पर्यंत वाढवली गेल्यासगोदामे रिक्त होण्याची वेळ येऊ शकली असती अशा स्थितीत गहू आयातीची वेळ आली असती. तसेच निर्यात बंदी केली नसती तर 2006-07या वर्षा सारखे परिस्थिती निर्माण झाली असती.गहू आयात करावा लागला होता आणि तो दीडपट किमतीने.तसेच गव्हाची निर्यातबंदी केली नसती तर भारतात गव्हाचे दर तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत वाढले  असते ते सध्या तेवीसशे रुपयांच्या आसपास आहेत.

सध्या गव्हाचा तुटवडा नसताना दर वाढले आहेत, सर तुटवडा निर्माण झाला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:CNG GAS; सीएनजीच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ, लवकरच गाठणार शंभरी?

नक्की वाचा:94 कोटींचा प्रस्ताव देईल 'या' शेतीच्या जोड धंद्याला नवसंजीवनी, राज्य सरकारचा हा आहे जबरदस्त प्लानिंग

नक्की वाचा:दुसरे खरेदीखत! 32 गुंठे जमीन अन 36 लाखांचा मोबदला

English Summary: indian goverment ban on export to wheat grain due to some important reason behind desion Published on: 15 May 2022, 11:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters