राज्यातील अनेक भागात पाऊस दमदार हजेरी लावत आहे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरूच आहे तरी अजून सुद्धा काही भागात पावसाचे प्रमाण हे कमीच दिसून येत आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्र भर पाऊस अशी स्थिती राज्यातील काही भागांमध्ये दिसून येत आहे.
दिवसभर उन्हाचा चटका, उकाडा आणि रात्र भर पाऊस:-
राज्यातील हवामानामध्ये सतत बदल घडून येत आहेत. काही कालावधी नंतर वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार पाऊसाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतेत सापडला आहे कारण पावसामुळे हाती आलेले पीक जाण्याची शेतकरी वर्गाला भीती आहे. शिवाय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील अनेक भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे यामध्ये विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात यांचा समावेश आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, हिस्सार, हर्दोई, गोरखपूर, पाटणा, जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारनंतर कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडला आहे. मेघगर्जना, तसेच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या व मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच हवामान खात्याने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड,बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना य अलर्ट जारी केला आहे.
Share your comments