1. बातम्या

गडचिरोलीतील शेतकऱ्यांची दयना, तेलवर्गीय पिकांचा वाढला भाव

अनेकवेळा आपण नेहमी घेण्यात येणाऱ्या पिकांना फाटा देत दुसरे पीक घेतो. पण आपण न पिकावलेल्या पिकांना अधिक भाव मिळते. अशीच परिस्थिती आता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
तेलवर्गीय पिकांचा वाढला भाव  (गडचिरोली)

तेलवर्गीय पिकांचा वाढला भाव (गडचिरोली)

अनेकवेळा आपण नेहमी घेण्यात येणाऱ्या पिकांना फाटा देत दुसरे पीक घेतो. पण आपण न पिकावलेल्या पिकांना अधिक भाव मिळते. अशीच परिस्थिती आता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यांमध्ये तेलवर्गीय पिकांचे उत्पादन चांगले घेतले जात होते. मात्र सातत्याने भाव पडत असल्याने शेतकऱ्यांना तोटा होत होता. 

परिणामी शेतकऱ्यांनी तेलवर्गीय पिकांची लागवड क्षेत्र कमी कमी केले, याचा परिणाम असा झाला की तेलवर्गीय पिकांचे लागवडीखालील क्षेत्र घटल्याने तेलाची मागणी वाढल्याने तेलवर्गीय पिकांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पुन्हा या पिकांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.तर मागील २० वर्षाचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने जवस, करडई इत्यादी पिकांचे उत्पादन घेत होते.

हेही वाचा : नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती आणि नोकरीचे उत्पन्न आवश्यकता नाही

परंतु कालांतराने या दोन्ही पिकांचे उत्पादन घेणे बंद झाले. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन लागवडीकडे वळला. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्‍टरपर्यंत सोयाबीनचा पेरा वाढला होता. परंतु पुरवठा जास्त झाल्याने काही दिवसांनंतर सोयाबीनच्या भावामध्ये पडझड सुरू झाले.

त्यामुळे उत्पादन कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीकडे आपला मोर्चा वळवला. आताचा विचार केला तर केवळ पाचशे हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. कपाशीसोबत मक्‍याचे क्षेत्र या जिल्ह्यात वाढताना दिसत आहे. कडधान्यांच्या ऐवजी आणि भाजीपाला ऐवजी मक्याच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

हेही वाचा : अरे व्वा ! आता इंधनावर अवलंबून राहणं होणार कमी; होणार इथेनॉलची निर्मिती

गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यातील शेतजमीन व एकंदरीत वातावरण तेलबियांच्या पिकांसाठी पोषक आहे. अगोदर रब्बी हंगामात जवस, करडई, भुईमूग, सूर्यफूल आदी तेलवर्गीय पिकांचे उत्पादन घेतले जात होते. मात्र काही वर्षांपासून या पिकांच्या जागा दुसऱ्या पिकांनी घेतल्यामुळे तेलवर्गीय पिकांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेलवर्गीय पिकांचे उत्पादन घेऊन अधिकचा नफा कमवण्याची उत्तम संधी आहे.

 

तेलवर्गीय पिकांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी पाण्यामध्ये त्यांचे उत्पादन चांगले येते. तसेच या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात होत असल्याने कीटकनाशकं वरचा खर्च वाचतो. धान पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी जवस करडे सारख्या पिकांचे उत्पादन घेणे शक्य आहे.

English Summary: increased prices of oilseeds in Gadchiroli Published on: 06 January 2021, 12:46 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters