कोविडच्या प्रादुर्भावानंतर आरोग्य विम्याबाबत ग्राहकांची बदलती मानसिकता जाणून घेण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डने भारताच्या उत्तर, दक्षिण, पुर्व आणि पश्चिम भागात केलेल्या व्यापक सर्वेक्षणात पश्चिम भारतात आरोग्य विम्याच्या मागणीत सर्वाधिक वाढ झाल्याचे आढळून आले. कोविडच्या प्रादुर्भावानंतर आरोग्य विम्याबाबत ग्राहकांची बदलती मानसिकता जाणून घेण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डने भारताच्या उत्तर, दक्षिण, पुव आणि पश्चिम भागात हे सर्वेक्षण नुकतेच केले.
या सर्वेक्षणात त्यांनी पश्चिम भारतात 558 नागरिकांच्या मुलाखती घेत त्यांची धारणा जाणून घेतली. या 558 नागरिकांपैकी 446 नागरिक पुर्वीपासून आरोग्यविमाधारक आहेत तर 112 जणांकडे आरोग्य विमाच नसल्याचे आढळले.
हेही वाचा : आयसीआयसीआय लोम्बार्डने आणल्या चार नवीन आरोग्य विमा योजना
पश्चिम भारतात कोवीड-19 च्या प्रादुर्भावानंतर आरोग्य विम्याच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या 6 महिन्यात 15 टक्के ग्राहकांनी नवीन विमा पॉलिसी घेतली आहे. 26 टक्के नागरिकांनी गेल्या एक वर्षात विमा पॉलिसी घेतली आहे. अवघ्या 58 टक्के नागरिकांनी त्यांच्याकडे सध्या असलेली विमा पॉलिसी ही एक वर्षापुर्वी काढलेली आहे. आरोग्य विमा उतरविण्याकरिता ग्राहकांसाठी एजंट हाच प्राथमिक स्त्रोत असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. कोवीड-19 च्या उद्रेकानंतर मात्र ग्राहक हे स्वयंपुर्ण होताना दिसले. तब्बल 27 टक्के विमा पॉलिसी या वेबसाईटच्या माध्यमातून काढण्यात आल्याचे दिसून आले.
पश्चिम भारतातील सर्वेक्षणातील 87 टक्के नागरिकांनी आपतकालीन स्थितीत येणाऱ्या संभाव्य खर्चाची तरतुद करण्याच्या प्राथमिक कारणास्तव आरोग्य विमा पॉलिसी घेतल्याचे सांगितले.
त्यापैकी 31 ते 35 या वयोगटातील सहभागी व्यक्तींनी आरोग्य विमा घेण्यामागे करबचत हे प्रमुख कारण सांगितले आहे. निम्म्यापेक्षा अधिक व्यक्ती हे आरोग्य विमा पॉलिसीचा ब्रॅण्ड निवडण्यासाठी मित्र, कुटूंबीय आणि सहकाऱ्यांचा सल्ला घेत असल्याचे दिसून आले.
Share your comments